भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत ३-० अशा फरकाने पराभव स्वीकारला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला पहिल्यांदाच मायदेशात व्हाईटवॉश स्वीकारण्याची नामुष्की ओढावली. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृ्त्वात खेळत होता.
दरम्यान, मुंबईत भारताचा या मालिकेतील अखेरचा सामना झाला, ज्यात भारतीय संघ २५ धावांनी पराभूत झाला. या सामन्यानंतर रोहित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने तो फलंदाज आणि कर्णधार म्हणून अपयशी ठरल्याचे मान्य केले.