IND vs BAN: ‘१०० वर बाद होण्याची जोखीम स्वीकारणार होतो’, रोहितने सांगितला दुसऱ्या कसोटीतील प्लॅन

India won test series against bangladesh: बांगलादेशविरूद्ध मालिकेत भारताने विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहीत शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्यातील रणनीतीचा उलगडा केला आहे.
Rohit sharma
Rohit sharmaesakal
Updated on

Rohit Sharma reveals master plan of 2nd test : भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी बांगलादेश संघावर सात विकेट राखून मात केली आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी आपल्या नावावर केली. या कसोटीचे अडीच दिवस पाऊस, अंधुक प्रकाश, खेळण्याजोगे नसलेले मैदान यामुळे वाया गेले. त्यामुळे कसोटी अनिर्णित राहील, अशी दाट शक्यता निर्माण झाली होती; मात्र टीम इंडियाच्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताने कानपूर कसोटीत विजयाची पताका फडकवली. कसोटीतील बराचसा वेळ वाया गेल्यानंतर या कसोटीत विजय मिळवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा १०० धावांवर बाद होण्याची जोखीमही स्वीकारायला तयार होता. रोहितने कसोटी संपल्यानंतर याची कबुली दिली.

रोहितने या मालिकेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, कानपूर कसोटीचे अडीच दिवस वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी मैदानात उतरलो तेव्हा बांगलादेशचा डाव झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही फलंदाजीत काय करू शकतो, याचा विचार केला. या खेळपट्टीवर निकाल लावण्यासाठी आम्ही आक्रमक फटकेबाजी करण्याचे ठरवले. आक्रमक शैलीत फटकेबाजी करताना विकेट गमावण्याचीही भीती असते; पण आम्ही त्यासाठीही तयार होतो. १०० ते १२० धावांवर ऑलआउट होण्याची जोखीम पत्करायला तयार होतो.

Rohit sharma
ICC Test Ranking: बुमराहने अश्विनला मागे टाकत पटकावला पहिला नंबर! जैस्वाल-विराटनेही घेतली मोठी झेप

आकाश दीपचे कौतुक

रोहित म्हणाला, ‘‘आकाश दीप याने मोठ्या प्रमाणात स्थानिक क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्याच्याकडे गुणवत्ता व कौशल्य आहे. तो तंदुरुस्त आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ गोलंदाजी करू शकतो.’’

कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ आता तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत सुर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Rohit sharma
नागाच्या पिल्लाला का ग खवळलं ? ऋषभ पंतची बॉलिंग आणि राहुलचा प्रश्न, Video Viral

भारतीय ट्वेंटी-२० संघ -

सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.