बिनधास्त भिडा, 'जो होगा देखा जायेगा'...; Rohit Sharma अन् टीमची वर्ल्ड कपसाठी काहीही करण्याची होती तयारी

Rohit sharma plan in T20 world cup final: रोहित शर्माने कपील शोमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या अंतीम सामन्यातील टीम इंडियाच्या छुप्या रणनीतीचा उलघडा केला आहे.
rohit sharma
rohit sharma esakal
Updated on

T20 World Cup Final Match: कर्णधार रोहित शर्माने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या अंतीम सामन्यातील विजयामागील छुपी रणनीतीचा अखेर उलघडा केला आहे. अंतीम सामन्यात आफ्रिकन फलंदाज डेव्हिड मिल आणि हेनरिच क्लासेन टीम इंडियावर भारी पडत होते आणि सामना हळू हळू दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकत होता. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माने भारतीय खेळाडूंना 'स्लेजिंग' करण्यास सांगितले. पण रोहितने असे का सांगितले असेल हे जाणून घेऊयात.

रोहित शर्माने कपील शोमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या अंतीम सामन्यातील मैदानावरील एकूण परिस्थिती सांगितली. या शोमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मासह अर्शदीप सिंग, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे व अक्षर पटेल उपस्थित होते.

rohit sharma
चलाख, Rishabh Pant! वर्ल्ड कप फायनलमध्ये लढवलेली शक्कल रोहित शर्माने सांगून टाकली Video

रोहितने यावेळी अंतीम सामन्यातील संपूर्ण प्रसंग सांगितला, रोहित म्हणाला, "अशा कठीण वेळेत कर्णधाराला कठोर राहणे गरजेचे असते. कारण ज्याप्रमाणे खेळ चालत होता, कधी विकेट्स पडत होते तर कधी मोठी भागिदारी होत होती. अशावेळी तणाव घेऊन चालणार नव्हते. '

'सातव्या क्रमांकापर्यंत दक्षिण आफ्रिकेची तगडे फलंदाजी होती. त्यामुळे आम्हाला मिलर किंवा क्लासेनपैकी एकाला काहीही करून बाद करायचे होते. ३० चेंडूंमध्ये ३० धावांची गरज असताना रिषभ पंतने शक्कल लढवली आणि खेळ थांबवला. त्यामुळे सामन्याची लय तुटली आणि हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर क्लासेन माघारी परतला. '

'त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आफ्रिकेच्या फलंदाजाना चिडवण्याचा प्रयत्न केला. जेणे करून त्यांच्यावर दबाव निर्माण होईल. असे करणे गरजेचे होते कारण हा सामना आम्हाला काहीही करून जिंकायाचा होता आणि त्यासाठी आम्हाला दंड द्यावा लागला असता तरी काही हरकत नव्हती. म्हणून मी आपल्या खेळाडूंना सांगितलं, आफ्रिकन फलंदाजानांना जे बालायचंय ते बोला अम्पायर आणि रेफ्रीच आपण पाहून घेऊ. " रोहित म्हणाला.

रोहितने सांगितलेल्या या प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते की कर्णधार रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी किती आतूर होता आणि त्यासाठी काहीही करण्यास तयार होता.

rohit sharma
रोहित, मैं आपसे बोहोत प्यार करती हूँ! मुलीच्या प्रपोजनंतर Rohit Sharma लाजला पण, पत्नी रितिका... Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.