Rohit Sharma Press Conference: भारतीय क्रिकेट संघ जवळपास आता दीड महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. भारताला बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.
या सामन्यापूर्वी मंगळवारी (१७ सप्टेंबर) भारतीय संघाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होता. रोहितने विविध विषयांवर त्याची मतं व्यक्त केली आहेत. याच दरम्यान त्याने संघातील नव्या चेहऱ्यांबद्दलही भाष्य केले.