Rohit Sharma on Mohammed Shami Comeback: बांगलादेश कसोटी मालिकेतील एकतर्फी विजयानंतर भारतीय संघ उद्यापासून (१६ ऑक्टोबर) न्युझिलंडविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यातील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची संघात निवड केलेली नाही. शमी २०२३ वन-डे वर्ल्ड कपासून मैदानाबाहेर आहे.
न्युझीलंडविरूद्धच्या मालिकेत शमी पुनरागम करेल अशी चर्चा सुरू होती. तर बीसीसीआय सचीव जय शाह यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत शमी भारतीय संघाचा भाग असेल असे विधान केले होते. परंतु न्युझिलंडविरूद्धच्या मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने शमीच्या पुरागमनाबाबत मोठे विधान केले आहे. शमी पूर्णत: दुखापतीतून सावरल्याशिवाय त्याला आम्ही आस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत खेळवू शकत नाही, असे रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्मा पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत बोलताना म्हणाला, "ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात सामील करणे कठीण आहे. तो पुनरागमन करत असताना त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. त्यामुळे तो थोडा मागे पडला आणि त्याला पुन्हा सुरुवात करावी लागली. शमी पूर्णत: दुखापतीतून सावरल्याशिवाय आम्ही त्याला आस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत खेळवू शकत नाही."
बांगलादेश कसोटी मालिकेसाठी भारताने उपकर्णधाराची नियुक्ती केली नव्हती. पण, न्युझिलंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारताने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची उपकर्णधार म्हणून नेमणूक केली आहे. जसप्रीत बुमराहबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "बुमराह हा संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तो कधीही कर्णधार राहिलेला नाही, परंतु मी त्याच्याशी जी काही चर्चा करतो, त्यानुसार तो बॉलिंग युनिटचे नेतृत्व करतो. सामन्यादरम्यानही तो नेहमी चर्चा करतो. तो आमच्यासोबत आहे, ही चांगली गोष्ट आहे."
काही मीडिया रिपोर्टसनुसार रोहित शर्मा आस्ट्रेलियाविरूद्धच्या पाच सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात वयैक्तिक कारणांसाठी अनुपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे उपकर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहला संघाचे नेतृत्व करावे लागेल. जसप्रीत बुमराह एक अनुभवी खेळाडू असून संघाचे नेतृत्व करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.