Rohit Sharma Speech In Maharashtra Vidhan Bhawan : महाराष्ट्राच्या विधान भवनात आज टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना रोहित शर्माने मराठीतून भाषण केलं. रोहितपूर्वी सूर्याने देखील मराठीतून भाषण केलं होतं. त्यावेळी मिलरच्या कॅचचा उल्लेख झाला. हाच धागा पकडून रोहित शर्माने देखील आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.
महाराष्ट्र सरकारने आज विधान भवनात भारतीय संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार केला. टी 20 वर्ल्डकप जिंकलेला भारतीय संघ काल मुंबईत दाखल झाला होता. आत विधानभवनात महाराष्ट्र अन् मुंबईत खेळाडूंची विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकुमार यादव अन् रोहित शर्माने मराठीतून भाषण केलं.
रोहित शर्माने आपल्या भाषणावेळी सूर्यकुमारच्या ऐतिहासिक कॅचचा उल्लेख केला. रोहित शर्मा म्हणाला की, सूर्या म्हणाला की तो बॉल माझ्या हातात येऊन बसला. मी म्हणतो बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला नाहीतर मी सूर्यालाच बसवला असता.
रोहित शर्मा ज्यावेळी भाषण करण्यासाठी आला त्यावेळी समोर बसलेल्या प्रेक्षकांकडून मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा देण्यात आल्या. रोहितनं आपल्या भाषणाची सुरूवात सर्वांना माझा मोठा नमस्कार असे म्हणत केली. त्यानंतर रोहितने विधान भवनात आमंत्रित करत सत्कार केला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले.
रोहित म्हणाला की, 'सीएम साहेबांनी सांगितले की असा कार्यक्रम यापूर्वी विधान भवनात झाला नाही. आमच्यासाठी असा कार्यक्रम आयोजित केला हे पाहून आम्हाला देखील भरपूर आनंद झाला. आम्ही 11 वर्षे वर्ल्डकपची वाट पाहत होतो. मी सर्व संघाचे आभार मानतो.'
रोहित पुढे म्हणला की, 'हे माझ्यामुळं किंवा सूर्या, दुबे किंवा यशस्वीमुळं झालेलं नाही. तर संपूर्ण संघाचं हे यश आहे.' त्यानंतर रोहितनं सूर्याची देखील खेचली. अखेर रोहित शर्माने आपले भाषण जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत संपवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.