IND vs NZ: 'असेही दिवस येतात, जास्त काथ्याकूट करणार नाही', कर्णधार रोहित शर्माची पराभवानंतरही पाठराखण

Rohit Sharma: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिका पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याने मत मांडले आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

India vs New Zealand: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने ११३ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर न्यूझीलंडने २-० अशी मालिकेत आघाडी घेत विजयही निश्चित केला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले.

बारा वर्षांनंतर भारतीय संघाने मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. याचाच अर्थ आम्ही सातत्याने चांगला खेळ केलाय. चालू मालिकेत आमचा खराब खेळ आणि न्यूझीलंडचा चांगला खेळ झालाय, म्हणून मी लगेच कोणत्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावर बदलणार नाही.

कोणा खेळाडूवर कडाडून टिका करणार नाही. उगाच जास्त काथ्याकूट करणार नाही. खेळात असे होते. काही दिवस खराब असतात, काही सामन्यांत खराब खेळ होतो, असे मत भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

Rohit Sharma
IND vs NZ : भारतात कसोटी मालिका जिंकणं हे स्वप्न असतं, पण न्यूझीलंडने...; सचिन तेंडुलकरकडूनही न्यूझीलंडचे तोंडभरून कौतुक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.