Rohit Sharma Viral Video: "तो दिसतो तसा नाही..." विसरभोळ्या रोहितबाबत फेमस अंपायरने काय काय सांगितलं?

Rohit Sharma Viral Video Anil Chaudhary: रोहित शर्मा आता भारत विरुद्ध बांगलादेश विरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.
Umpire Anil Chaudhary On Rohit Sharma Viral Video
Umpire Anil Chaudhary On Rohit Sharma Viral VideoEsakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या गमतीशीर वागणुकीसाठी ओळखला जातो. पण क्रिकेटच्या मैदानावर अचूक निर्णय घेण्यात रोहित शर्माचा कोणीही हात धरू शकत नाही.

दरम्यान, भारतीय पंच अनिल चौधरी यांनी रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, रोहित शर्मा दिसतो तसा नाही, तो खूप हुशार आहे. त्याचा बॉल सेन्स अप्रतिम आहे."

अनिल चौधरी यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना रोहित शर्माबाबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अलीकडेच, शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर भारतीय पंच अनिल चौधरी पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. अनिल चौधरी म्हणाले की, "रोहितविरुद्ध पंचगिरी करणे हे खूप सोपे काम आहे. रोहित शर्मा तुम्हाला खूपच कॅज्युअल वाटतो, पण तो एक हुशार खेळाडू आहे. त्याचा क्रिकेटचा AQ अप्रतिम आहे. त्याला खेळाची चांगली समज आहे."

'रोहितची बॉल सेन्स अप्रतिम'

रोहित शर्माच्या फलंदाजीबद्दल बोलताना अनिल चौधरी म्हणाले, "जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा असे वाटते की गोलंदाजी 120 किमी/तास वेगाने होत आहे. जेव्हा दुसरा फलंदाज असतो तेव्हा असे दिसते की जणू काही 160 किमी/तास वेगाने गोलंदाजी होत आहे. क्रिकेटमध्ये बॉल सेन्स नावाचा शब्द आहे. रोहितचा तो बॉल सेन्स अप्रतिम आहे. कोणत्या चेंडूवर कधी पुढे जायचे आणि कोणत्या चेंडूवर मागे राहायचे हे त्याला चांगले माहीत असते."

Umpire Anil Chaudhary On Rohit Sharma Viral Video
Gautam Gambhir ने त्याच्या संघातून T20WC विजेत्या रोहित शर्माला बाहेर केले; जसप्रीत बुमराहला पण नाही घेतले

या पॉडकास्टमध्ये अनिल चौधरी असेही म्हणाले की, "रोहितसारख्या खेळाडूसाठी अंपायरिंग करणे खूप सोपे असते. एकतर तो आऊट असतो किंवा नॉट आउट. त्याच्या समोर अंपायरिंग करणे सोपे आहे. तो टुकू-टुकू खेळत नाही. त्यामुळे अशा खेळाडूला अंपायरिंग करणे खूप सोपे असते.

श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय मालिकेपासून भारतीय संघ कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा आता भारत विरुद्ध बांगलादेश विरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.

Umpire Anil Chaudhary On Rohit Sharma Viral Video
MS Dhoni ने माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावली, मी त्याला कधीच माफ करणार नाही! कोणी केले गंभीर आरोप?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.