स्मार्ट ऋतुराज! योग्य DRS अन् Ajinkya Rahane चे शतक ३ धावांनी हुकले; पण सर्फराजने झोडले

Ruturaj Gaikwad's DRS Decision Denies Ajinkya Rahane Hundred in Irani Cup: इराणी कप सामन्यात ऋतुराज गायकवाडने घेतलेल्या अचुक DRS मुळे मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. पण सर्फराज खानने मात्र शतक पूर्ण केले आहे.
Ajinkya Rahane | Ruturaj Gaikwad | Sarfaraz Khan
Ajinkya Rahane | Ruturaj Gaikwad | Sarfaraz KhanSakal
Updated on

Sarfaraz Khan Hundred in Irani Cup: इराणी कप २०२४ स्पर्धेचा सामना मंगळवारी (१ ऑक्टोबर) सुरू झाला आहे. लखनौमधील एकाना क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात २०२३-२४ रणजी ट्रॉफी विजेता मुंबई संघ विरुद्ध शेष भारत संघ खेळत आहेत.

पहिल्याच डावात मुंबईची खडूस फलंदाजी पाहायला मिळाली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सर्फराज खान यांनी शानदार खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली. मात्र शेष भारत संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने चपळाईने घेतलेल्या DRS मुळे रहाणेचं शतक अगदी थोडक्यात हुकले.

Ajinkya Rahane | Ruturaj Gaikwad | Sarfaraz Khan
ऋतुराज गायकवाड Vs Ajinkya Rahane! श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी हेही भिडणार; वाचा जबरदस्त सामना केव्हा कुठे रंगणार

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या डावात ३७ धावांवर ३ विकेट्स गमावल्यानंतर रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला होता. त्यांनी १०२ धावांची भागीदारी केली. पण अय्यर ५७ धावांवर बाद झाला.

परंतु, त्यानंतरही सर्फराजने शानदार साथ रहाणेला दिली. त्यांच्या भागीदारीमुळे पहिल्या दिवस अखेर मुंबईने ६८ षटकात ४ बाद २३७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीही रहाणे आणि सर्फराजने चांगली सुरुवात केलेली. मात्र ७९ व्या षटकात रहाणे बाद झाला. त्यामुळे त्यांची १३१ धावांची भागीदारी तुटली.

Ajinkya Rahane | Ruturaj Gaikwad | Sarfaraz Khan
Irani Cup 2024: कॅप्टन Ajinkya Rahane शतकाच्या उंबरठ्यावर, तर श्रेयस अय्यर-सर्फराजच्याही फिफ्टी

झाले असे की यश दयाल गोलंदाजी करत होता. त्याने ७९ व्या षटकातील तिसरा चेंडू बाऊंसर टाकला. त्यावर शॉट खेळताना रहाणे चुकला. त्यामुळे चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला स्पर्श करत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला. मात्र आधी पंचांनी तो नाबाद असल्याचा निर्णय दिला.

मात्र फार वेळही न घेता ऋतुराजने लगेचच DRS ची मागणी केली. रिप्लेमध्ये रहाणेच्या ग्लव्ह्जला चेंडूचा स्पर्श झाल्याचे दिसले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि रहाणेला बाद द्यावे लागले. रहाणे बाद झाला, तेव्हा तो २३४ चेंडूत ९७ धावांवर खेळत होता. त्याच्या या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

तो बाद झाला असला तरी तनुष कोटियनने सर्फराजची चांगली साथ दिली. त्याच्यातही अर्धशतकी भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान सर्फराजने शतक पूर्ण केले. त्याचे हे प्रथम श्रेणीमधील ५१ व्या सामन्यातील १५ वे शतक ठरले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने साधारण ९० षटकांमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.