ICC Ranking : भले शाब्बास! Ruturaj Gaikwad ची टॉप १० मध्ये एन्ट्री; शतकवीर अभिषेक शर्माचीही गगनभरारी

ICC Men’s T20I Rankings - झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात शतक झळकावणारा अभिषेक शर्मा व रिंकू सिंग यांचीही मोठी झेप
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad Enters Top 10 In Updated ICC T20I Rankingssakal
Updated on

India batter break into top 10 of ICC Rankings - भारताची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौरा गाजवतेय... पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात दमदार खेळ केला. अभिषेक शर्माच्या ( Abhishek Sharma) शतकी खेळीला ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि रिंकू सिंग ( Rinku Singh) यांच्या आक्रमक फटकेबाजीची साथ मिळाली. भारताने दणदणीत विजयासह मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर भारतीय फलंदाजांनी आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत मोठी झेप घेतली.

Ruturaj Gaikwad
Team India Coach: गौतम गंभीरचा 'माणूस' BCCI ला नकोसा? बॉलिंग कोचसाठी उतरवले दोन तगडे स्पर्धक

भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याने फलंदाजांच्या क्रमवारीत १३ स्थानांची झेप घेताना टॉप १० मध्ये एन्ट्री घेतली. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ऋतुराजने ४७ चेंडूंत ७७ धावांची नाबाद खेळी केली होती. या सामन्यापूर्वी ऋतुराज ट्वेंटी-२० क्रमवारीत २०व्या क्रमांकावर होता, परंतु आता तो सातव्या स्थानी आला आहे. Zimbabwe v India 2nd T20I Series

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली आणि युवा खेळाडूंचा ताफा झिम्बाब्वेत ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झाला. विराट कोहली, रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर दावा सांगण्यासाठी युवा खेळाडूंना हीच संधी आहे.

Ruturaj Gaikwad
Rohit Sharma, Virat Kohli यांनी आणखी एक वर्ष खेळायला हवं होतं, पण...; दिलीप वेंगसरकर यांचं स्पष्ट मत, गौतम गंभीरकडून अपेक्षा

गायकवाडसह रिंकू व अभिषेक यांनी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव खेळाडू असलेल्या रिंकूने झिम्बाब्वेच्या दुसऱ्या सामन्यात २२ चेंडूंत नाबाद ४८ धावा कुटल्या. पहिल्या सामन्यात भोपळ्यावर बाद झालेल्या अभिषेकने दुसऱ्या सामन्यात ४७ चेंडूंत १०० धावांची विक्रमी खेळी केली. त्या जोरावर तो ७५व्या क्रमांकावर आला आहे. सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

झिम्बाब्वेच्या ब्रायन बेन्नेट्ट २५ स्थानांची झेप घेताना ९६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ट्वेंटी-२० गोलंदाजांमध्ये अॅडम झम्पा ( ७), फजलहक फारुकी ( ८) आणि महिश थिक्षणा ( १०) हे टॉप टेनमध्ये कायम आहेत. अक्षर पटेल व कुलदीप यादव यांना झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती दिल्याने त्यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. पण, झिम्बाब्वे दौऱ्यातील दोन सामन्यांत सहा विकेट्स घेणाऱ्या रवी बिश्नोईने ८ स्थानांच्या सुधारणेसह १४ वे स्थान पटकावले आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा अव्वल स्थानावर कायम आहे, तर हार्दिक पांड्या दुसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.