Ruturaj Gaikwad सोबत झाला मोठा गेम? टीम इंडियाची घोषणा होताच चर्चेला उधाण

Ruturaj Gaikwad Omitted from India Squads for SA and AUS tour: बीसीसीआयने आगामी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघांची घोषणा केली. मात्र या दोन्ही दौऱ्यांसाठी भारतीय संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश न झाल्याने चाहत्यांकडून निवड समितीवर टीका होत आहे.
Team India | Ruturaj Gaikwad
Team India | Ruturaj GaikwadSakal
Updated on

India Squad for South Africa vs Australia Tour: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघांची घोषणा केली. भारताला ८ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ४ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे, तर २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.

दरम्यान, या दोन्ही मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर झाले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत अभिमन्यू ईश्वरन, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा अशा नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

मात्र, ऋतुराज गायकवाड याला टी२० आणि कसोटी अशा दोन्ही संघात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे.

ऋतुराज गेल्या काही महिन्यात भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र, तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेट आणि भारत अ संघाकडून खेळताना दिसत आहे. अशात त्याला संधी दिली गेल्याने सोशल मीडियावर ऋतुराजसोबत अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Team India | Ruturaj Gaikwad
Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.