Ruturaj Gaikwad च्या नेतृत्वाखालील संघाने श्रेयस अय्यरच्या टीमला नमवले; Duleep Trophy त महत्त्वाचे ६ गुण कमावले

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीत पहिला विजय ऋतुराज गायकवाडच्या भारत क संघाच्या नावावर राहिला. त्यांनी श्रेयस अय्यरच्या ड संघाचा पराभव केला.
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad esakal
Updated on

India C defeated India D in Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत क संघाने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यांनी श्रेयस अय्यरच्या भारत ड संघाचा पराभव करून महत्त्वाचे ६ गुण खात्यात जमा केले. ७ विकेट्स घेणारा मानव सुतार या सामन्यात चमकला.

भारत ड ने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १६४ धावा केल्या. अक्षर पटेल ( ८६) हा त्यांच्याकडून त्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारत क च्या विजयकुमार वैशाकने ३, अंशूल कंबोज व हिमांशू चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारत क संघालाही १६८ धावा करता आल्या. बाबा इंद्रजितने सर्वाधिक ७२ धावा केल्या आणि त्याला अभिषेक पोरेलची ( ३४) चांगली साथ मिळाली. हर्षित राणाने चार विकेट्स घेतल्या.

Ruturaj Gaikwad
Riyan Parag चा पारा चढला, ऋषभ पंतने झेल घेताच संतापला; पाहा नेमकं घडलं तरी काय

भारत ड संघाने दुसऱ्या डावात २३६ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर ( ५४), देवदत्त पड्डिकल ( ५६) व रिकी भूई ( ४४) यांनी दमदार फलंदाजी केली. अक्षर पटेलने २८ धावांचे योगदान दिले. भारत क संघाच्या मानव सुतारने ४९ धावांत ७ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऋतुराजने ४८ चेंडूंतत ४६ धावांची खेळी केली. आर्यन जुयाल ( ४७) व रजत पाटीदार ( ४४) यांच्यासह अभिषेक पोरेल ( ३५) व साई सुदर्शन ( २२) यांनी चांगला खेळ केला. भारत क ने ६ बाद २३३ धावा करून विजय पक्का केला.

दरम्यान, भारत ब आणि भारत अ संघांमधील लढतीत ब संघाचे २३० धावांची आघाडी घेतली आहे. भारत ब संघाच्या पहिल्या डावातील ३२१ धावांच्या प्रत्यत्तरात भारत अ संघाला २३१ धावा करता आल्या. ब संघाकडून मुशीर खान ( १८१) आणि नवदीप सैनी ( ५६) यांनी चांगली फलंदजी केली होती. दुसऱ्या डावात ब संघाने २५ षटकांत ५ बाद १४० धावा केल्या आहेत. सरफराज खान ( ४६) आणि ऋषभ पंत ( ६१ ) यांनी दमदार फटकेबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.