Captain Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड बनला कॅप्टन! 'या' मानाच्या स्पर्धेत दाखवणार नेतृत्व कौशल्य

Ruturaj Gaikwad has been appointed captain - झिम्बाब्वे दौरा गाजवल्यानंतरही ऋतुराज गायकवाडला श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवडले गेले नाही. ऋतुराजवर अन्याय झाल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे.
Ruturaj Gaikwad has been appointed captain
Ruturaj Gaikwad has been appointed captainsakal
Updated on

Ruturaj Gaikwad has been appointed captain - भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि २७ जुलैपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात ऋतुराज गायकवाडचे नाव नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेत ऋतुराजने दमदार कामगिरी केली होती. तरीही त्याला श्रीलंका दौऱ्यासाठीच्या ट्वेंटी-२० संघात स्थान मिळालेले नाही. पण, आता ऋतुराजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Ruturaj Gaikwad has been appointed captain
IND vs SL : गौतम गंभीरला ट्वेंटी-२० संघात Mumbai Indians चा 'हा' खेळाडू हवा होता, पण...

आगामी रणजी करंडक २०२४-२५ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व ऋतुराजकडे सोपवले गेले आहे. मागच्या वर्षी केदार जाधवने महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले होते, परंतु जून महिन्यात भारताच्या अष्टपैलू खेळाडूने निवृत्ती जाहीर केली. मागच्या वर्षी ऋतुराज भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघाचा सदस्य होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्वही त्याने सांभाळले आहे.

मागच्या पर्वात दुखापतीमुळे त्याला रणजी करंडक स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागले होते. पण, यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत त्याला उल्लेखनीय कामगिरी करून भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी आहे. त्याने यापूर्वीही लिस्ट ए क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सांभाळले होते.

Ruturaj Gaikwad has been appointed captain
IND vs SL: मोठी बातमी! श्रीलंकेच्या प्रमुख गोलंदाजाचं बोट मोडलं, भारताविरुद्धच्या मालिकेतून घेतली माघार

महाराष्ट्राचा संभाव्य रणजी संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), सौरभ नवले, अंकित बावणे, मंदार भंडारी, निखिल नाईक, हितेश वाळुंज, सिद्धेश वीर, विकी ओस्तवाल, सचिन धस, सत्यजित बच्चाव, हर्षल काटे, तरणजित सिंग ढिल्लोन, यश क्षीरसागर, प्रशांत सोळंकी, अर्शीन कुलकर्णी, राजवर्धन हंगर्गेकर, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, दिग्विजय पाटील, मुकेश चौधरी, आझीम काझी, प्रदीप दाढे, सिद्धार्थ म्हात्रे, मनोग इंगले, मेहुल पटेल, रजनीश गुर्बानी, मुर्तझा ट्रंकवाला, वैभव गोसावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com