Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

Ruturaj Gaikwad brilliant catch to dismiss Riyan Parag: दुलीप ट्रॉफी स्पर्धेत भारत क संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सूर मारत डाव्या हाताने रियान परागचा अप्रतिम झेल घेतला. त्याच्या झेलाचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Ruturaj Gaikwad One Handed Catch
Ruturaj Gaikwad One Handed CatchSakal
Updated on

Duleep Trophy 2024, India A vs India C: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील तिसरी आणि अखेरची फेरी सध्या सुरू आहे. या स्पर्धेतील सामने रोमांचक झाले आहेत. दरम्यान, ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेला भारत क संघ चांगल्या फॉर्ममध्येही आहे.

मात्र तिसऱ्या फेरीत त्यांना भारत अ संघाने संघर्ष करायला लागवा आहे. सध्या दोन्ही संघ विजेतेपद मिळवण्यासाठी शर्यतीत आहेत. विजेता ठरवण्यासाठी हा सामना महत्त्वाचाही आहे. दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघात चुरस दिसत असतानाच ऋतुराजच्या नेतृत्वाबरोबरच त्याच्या क्षेत्ररक्षणानेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात ६३ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ते फलंदाजीला उतरले. दुसऱ्या डावात देखील भारत अ संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती त्यांनी ९४ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या.

Ruturaj Gaikwad One Handed Catch
Duleep Trophy: सॅमसनच्या शतकाला कॅप्टन ईश्वरनचे शतकी प्रत्युत्तर; मुशीर खानसह सूर्यकुमारही अपयशी

मात्र नंतर रियान पराग आणि शाश्वत रावत यांनी शतकी भागीदारी करत डाव सांभाळला. पण अखेर ४९ व्या षटकात गौरव यादवने अर्धशतक करणाऱ्या रियान परागला बाद करत त्यांच्या जोडी तोडली. रियानला बाद करण्यात ऋतुराजचेही मोठे योगदान राहिले, त्याने घेतलेला झेल अफलातून होता.

गौरवने ४९ व्या षटकातील टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर रियानने ऑफ साईडला मोठा फटका खेळला. पण तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या ऋतुराजने मागे उडी मारत डाव्या हाताने अप्रतिम झेल घेतला.

त्याच्या या झेलाचा व्हिडिओ बीसीसीआयनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या झेलमुळे रियान पराग १०१ चेंडूत ७३ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर शाश्वत रावतही ५३ धावांवर बाद झाला.

Ruturaj Gaikwad One Handed Catch
Duleep Trophy 2024: ऋतुराजच्या टीमने मिळवला 'पहिला नंबर'! इंडिया बी विरुद्ध सामना ड्रॉ अन् आता ट्रॉफीपासून फक्त एक विजय दूर

तत्पुर्वी या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात ९०.५ षटकात सर्वबाद २९७ धावा केल्या. भारत अ संघाकडून शाश्वत रावतने पहिल्या डावात १२४ धावांची खेळी केली होती. तसेच आवेश खानने नाबाद ५१ आणि शम्स मुलानीने ४४ धावा केल्या होत्या. भारत क संघाकडून विजयकुमार वैशाखने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर भारत क संघाला पहिल्या डावात ७१ षटकात सर्वबाद २३२ धावाच करता आल्या. भारत क संघाकडून इशान पोरेलने ८२ धावांची खेळी केली, तर पुकीत नारंगने ४१ धावा केल्या. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

भारत क संघाचे फलंदाज ऋतुराज आणि इशान किशन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र या सामन्यात त्यांना विशेष मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात ऋतुराज १७ धावांवर आणि इशान किशन ५ धावांवर बाद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.