Sanju Samson Century: डर्बनमधील किंग्समेड मैदानात भारतीय फलंदाजांकडून वादळी खेळ पाहायला मिळाला. टी२० वर्ल्ड कप फायनलनंतर पहिल्यांदाच भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ टी२०मध्ये आमने-सामने आले आहेत. या दोन संघात शुक्रवारी पहिला टी२० सामना खेळला जात आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद २०२ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात संजू सॅमसनने खणखणीत शतक ठोकले. मात्र, त्याच्या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेने झटपट विकेट्स घेतल्याने भारताला आणखी मोठी धावसंख्या पार करता आल्या नाहीत.