Full Schudule of SA20 League 2025 : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धेचे वारे जोरात वाहत असताना लीगचे वेळापत्रक समोर आले आहे. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी आणि मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे संघ पहिल्याच लढतीत समोरासमोर येणार आहेत. गतिवेजेता सनरायझर्स ईस्टर्न केप संघ दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगचा सलामीचा सामना खेळणार आहे. त्यांच्यासमोर मुंबई इंडियन्स केप टाऊन संघाचे आव्हान असणार आहे.
सनरायझर्स ईस्टर्न केप संघ त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच जॉर्ज पार्क येथे हा सामना ९ जानेवारी २०२५ ला खेळणार आहे. SA20 लीगच्या तिसऱ्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर झाले आणि ८ फेब्रुवारी २०२५ ला जोहान्सबर्गच्या वंडरर्स स्टेडियमवर फायनल होणार आहे.
मागील दोन पर्वांतील उप विजेते प्रेटोरिया कॅपिटल्स आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात दुसरा सामना होईल. स्पर्धेच्या पहिल्या शनिवारी डबल हेडर मुकाबल्यात पर्ल रॉयल्स- सनरायझर्स आणि जोबर्ग सुपर किंग्स-एमआय केप टाऊन समोरासमोर असणार आहेत.
३० दिवस चालणाऱ्या या लीगमधील अव्वल चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरतील.. Gqeberha येथे पहिला क्वालिफायर सामना ४ फेब्रुवारीलाल होईल, तर सुपर स्पोर्ट्स पार्क येथे एलिमिनेटर ( ५ फेब्रुवारी) आणि क्वालिफायर २ ( ६ फेब्रुवारी) लढती होतील. एका दिवसाच्या ब्रेकनंतर फायनल होईल.
SA20च्या तिसऱ्या पर्वात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन हा सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक रॉयल्सकडून खेळेल आणि त्याच्या संघात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटही आहे.
MI Cape Town ने अष्टपैलू खेळाडू राशीद खान याला करारबद्ध केले आहे आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्टही फ्रँचायझीकडून खेळणार आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्लाह ओमारझाई, श्रीलंकेचा नुवान तुषारा आणि ख्रिस बेंजामिन यांनाही फ्रँचायझीने संघात कायम राखले आहे. प्री साईन स्थानिक खेळाडूंमध्ये कागिसो रबाडा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, रायन रिकल्टन, जॉर्ज लिंडे, डेलानो पॉटगिएटर, थॉमस कबेर आणि कोनोर यांची समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.