Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर विरुद्ध सचिन तेंडुलकर...! सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

Sachin Tendulkar Video: सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात तो स्वत:विरुद्धच खेळताना दिसतोय
Sachin Tendulkar
Sachin TendulkarSakal
Updated on

Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करत अनेक विक्रम केले आहेत. पण सध्या त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे, ज्यात तो डाव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करताना दिसत आहे.

१३ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय डावखुऱ्यांचा दिवस (Left Handed Day) म्हणून साजरा केला जातो. याच दिवसानिमित्त सचिनने हा व्हिडिओ शेअर केला आहे. खरंतर सचिन हा डावखुरा आहे, पण त्याने त्याच्या प्रोफेशनल करियरमध्ये उजव्या हातांनी गोलंदाजी आणि फलंदाजी केली.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar : मित्रा वर्तुळ पूर्ण झालं...! वर्ल्ड कप जिंकल्यावर क्रिकेटच्या देवाचा राहुल द्रविडसाठी भावूक मेसेज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.