India vs New Zealand, 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामना रोमांचक ठरताना दिसत आहे. कधी पारडं न्यूझीलंडकडे झुकत आहे, तर कधी भारताकडे झुकताना दिसत आहे. भारताचा संघ पहिल्या डावात ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर न्यूझीलंडने तब्बल ३५६ धावांची आघाडी घेतली होती.
न्यूझीलंड संघाने रचिन रविंद्रने केलेल्या १३४ धावांच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. पण त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चांगले पुनरागमन केले.
भारताकडून सर्फराज खानने दीडशतकी खेळी केली. ही खेळी करताना त्याने आधी विराट कोहलीबरोबर १३६ धावांची भागीदारी आणि नंतर ऋषभ पंतबरोबर १७७ धावांची भागीदारी करत भारताची ३५६ धावांची पिछाडी भरून काढून आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.