sachin tendulkar
sachin tendulkaresakal

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Sachin Tendulkar: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मराठमोळा खेळाडू सचिन तेंडूलकरनेही आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
Published on

Sachin Tendulkar: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर अभिनंदनाची पोस्ट शेअर केली आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे मराठी भाषेला मिळालेला हा सन्मान आहे, असे सचिनने पोस्टमध्ये नमूद केले.

३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. सरकारने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेमध्ये आनंद पसरवणारा ठरला आहे. गेल्या ६० वर्षांपासून होणाऱ्या मागणीला अखेर यश आले आहे. त्यामुळे मराठी भाषा आता सर्वदूर पोहचेल. मराठीचसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

sachin tendulkar
Marathi Language: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नेमकं काय फायदा होणार? अभिजात भाषेचे निकष काय असतात? जाणून घ्या

केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठी जनामध्ये आनंदाचे वातावरण निर्णाम झाले आहे. सर्व स्तरांमधून सरकारच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. अशातच भारतीय दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरनेही आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सचिन म्हणाला, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी मनाला अभिमान वाटतो. हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाला दिलेली ओळख आहे. बरोबरच असमिया, बंगाली, पाली, आणि प्राकृत या भाषांनाही हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन! जास्तीत जास्त लोकांना या सुंदर भाषांचे सौंदर्य अनुभवता येईल!"

अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय होणार?

जेव्हा केंद्र सरकार एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून घोषित करते तेव्हा त्या भाषेच्या समृद्धीसाठी अधिक निधी दिला जातो. माहितीनुसार, भाषेच्या समृद्धीसाठी केंद्र सरकार दरवर्षी २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान देते. यासोबत, भाषेचा प्रचार करण्यासाठी भाषा भवन उभारणे, ग्रंथ आणि साहित्याच्या प्रचार करण्यासाठी मदत करणे, ग्रंथालय उभारणे यासह इतर उपक्रमांच्या माध्यमातून भाषेच्या प्रचार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने आता दरवर्षी भाषेतील विद्वानांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. प्रत्येक विद्यापीठात भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात येईल. याशिवाय देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...