Video: सचिन मित्राला मदत कर...! विनोद कांबळीचा 'तो' व्हायरल व्हिडिओनंतर चाहत्यांची क्रिकेटच्या देवाला साद

Netizens on Sachin Tendulkar and Vinod Kambli Latest Updates: एक काळ असा होता जेव्हा विनोद कांबळीने भारतीय क्रिकेट संघासाठी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा सचिन तेंडुलकरपेक्षा तो चांगला क्रिकेटर मानला जात होता. पण काळाचे चाक असे फिरले की सर्वकाही बदलले....
Sachin Tendulkar and Vinod Kambli Latest News
Sachin Tendulkar and Vinod Kambli Latest Newssakal
Updated on

Vinod Kambli Video Viral : एक काळ असा होता जेव्हा विनोद कांबळीने भारतीय क्रिकेट संघासाठी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा सचिन तेंडुलकरपेक्षा तो चांगला क्रिकेटर मानला जात होता. पण काळाचे चाक असे फिरले की सर्वकाही बदलले.... सचिनला क्रिकेटमध्ये देवाचा दर्जा मिळाला तर त्याचा मित्र विनोद कांबळीची अवस्था अशी झाली की त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते.

Sachin Tendulkar and Vinod Kambli Latest News
NIsha Dahiya Injury : काही करून निशाला जखमी कर, कोपऱ्यातून सूचना आल्या अन्...! भारतीय प्रशिक्षकाचा खळबळजनक दावा

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचा जवळचा मित्र विनोद कांबळीचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये कांबळी इतका असहाय्य दिसत आहे की काही लोक त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसत आहेत. या व्हिडिओत त्याची अवस्था पाहून सगळेच हैराण झाले.

Sachin Tendulkar and Vinod Kambli Latest News
Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आज उतरणार मैदानात, जाणून घ्या कधी अन् किती वाजता सुरू होणार सामना?

सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी विनोद कांबळी दारूच्या नशेत असल्याचा अंदाज लावला, तर इतर अनेकांनी सांगितले की त्याची तब्येत खालावल्यामुळे त्याला नीट चालता येत नाही. पण विनोद कांबळी असे पाहून त्याच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे काही चाहत्यांनी क्रिकेटचा देवा सचिन तेंडुलकरला बालपणीचा मित्र कांबळीची मदत करण्याची साद घालत आहे.

Sachin Tendulkar and Vinod Kambli Latest News
Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'गोल्‍ड मेडल' जिंकणाऱ्या खेळाडूला आली गार्डनमध्ये झोपण्याची वेळ, काय घडलं नेमकं ?

विनोद कांबळीची कारकीर्द

विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द भलेही छोटी असली तरी ती चमकदार राहिली आहे. त्याने भारतासाठी 17कसोटी सामने खेळले. त्याने 2 फेब्रुवारी 1993 रोजी इडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध पदार्पणात 1084 धावा केल्या. कांबळीने त्याच्या कसोटी कारकिर्दीव्यतिरिक्त 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या. 129 सामन्यांमध्ये 59.67 च्या प्रभावी सरासरीने 9965 धावांसह त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रम प्रशंसनीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.