PAK vs ENG: लढले, अडखळले, पण शेवटी पाकिस्तानने शस्त्र टाकले; इंग्लंडचे खेळाडू चतुराईने खेळले

PAK vs ENG 2nd Test: इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात पाकिस्तानने सामन्यात २९६ धावांनी आघाडी घेतली आहे.
ENG vs PAK
ENG vs PAKesakal
Updated on

PAK vs ENG 2nd Test: पाकिस्तानने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेला चांगली सुरूवात केली. पाकिस्तानने पदार्पणवीर कामरान घुलामच्या मदतीने पहिल्या डावात ३६६ धावा उभारल्या. प्रत्यत्तरात इंग्लंडने चांगली सुरूवात केली. सलामीवीर बेन डकेटने शतकही लगावले. पाकिस्तानचा फिरकीपटू साजीद खानने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला आणि पाकिस्तानने सामन्यात आघाडी घेतली.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात इंग्लंडने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण सलमान आघाने अर्धशतकीय खेळी करत पाकिस्तानचा डाव सावरला. पकिस्तानने दुसऱ्या डावात २२१ धावा उभारल्या व सामन्यात २९६ धावांची आघाडी घेतली. आणखी २ दीवसांचा खेळ बाकी असून इंग्लंडसाठी ही आघाडी मोठी नसल्याने इंग्लंडला सामना जिंकण्याची संधी आहे.

ENG vs PAK
IND vs NZ 1st Test : Devon Conway चे शतक हुकले, पण टीम इंडियाला किवींनी रडवले; ऋषभच्या दुखापतीने टेंशन वाढवले

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. पाकिस्तानचा युवा सालामीवीर साईम आयुबने सामन्यात अर्धशतक झळकावले. तर पदापर्णवीर कामरान घुलामने डावात दणदणीत शतक ठोकले. कामरान घुलामने पदापर्णाच्या डावात शतक लगावून फलंदाज बाबर आझमच्या संघातील स्थानाला आव्हान दिले आहे. दोघांनी सामन्यात १४९ धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानने पहिल्या डावात ३६६ धावा उभारल्या. या डावात इंग्लंडच्या जॅक लिचने ४ विकेट्स घेतले.

प्रत्यत्तरात उतरलेल्या इंग्लंडने डावाची सुंदर सुरूवात केली. झॅक क्रोलीच्या रूपाने ७३ धावांवर इंग्लंडला पहिला धक्का मिळाला. पण साथीदार बेन डकेटने इंग्लंडचा डाव सावरला. पुढे ऑली पोप व जो रूटला साथीला घेत डकेटने इंग्लंडची धावसंख्या २०० पार केली. परंतु त्यानंतर इंग्लंडची खेळी घरंगळायला सुरूवात झाली. पाकिस्तानचा फिरकीपटू साजीद खानला इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवण्यात यश व उर्वरित ३ विकेट्स नोमान अलीच्या खात्यात गेल्या. इंग्लंडचा पहिला डाव २९२ धावांवर आटपला.

ENG vs PAK
IND vs NZ 1st Test : Rishabh Pant ला दुखापत, सोडावे लागले मैदान! टीम इंडियासाठी दुष्काळात तेरावा महिना...

पाकिस्तान सामन्यात आघाडीवर असताना इंग्लंडने सामन्यात पुनरागमन करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानच्या सुरुवातीच्या तीन फलंदाजाना शोएब बशीरने माघारी पाठले. तर पहिल्या डावातील सलामीवीर कामरान घुलाम व साऊद शकीलला बाद करण्यात झॅक लिचला करण्यात यश आले. परंतु ७व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सलमान अघाने साजीद खानला साथीला घेत पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरूवात केली. सलमानने ५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले. सलामनला ६३ धावांवर ब्रायडन कार्सने बाद केले आणि पाकिस्तानचा डाव २२१ धावांवर आटपला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.