IPL 2025 Auction: राहुलचा लेक, Samit Dravid आयपीएल २०२५ खेळणार? पात्रता निकष काय आहेत ते घ्या जाणून

Samit Dravid in IPL 2025 : भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा मुलगा सध्या महाराजा ट्वेंटी-२० लीग गाजवतोय आणि आता तो आयपीएल खेळणार असल्याची चर्चा आहे.
Samit Dravid IPL2025
Samit Dravid IPL2025esakal
Updated on

Samit Dravid in IPL 2025 Eligibility criteria: समित द्रविड महाराजा ट्वेंटी-२० लीगमध्ये करत असलेल्या फटकेबाजीची सध्या जोरदार चर्चा आहे. समितची फलंदाजीची शैली ही वडील राहुल द्रविड याच्यासारखीच दिसतेय. त्यामुळे नेटिझन्स आतापासूनच त्या लिटल दी वॉल असे म्हणू लागले आहेत आणि त्याला आयपीएल २०२५ पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. महाराजा ट्रॉफीत मैसूर वॉरियर्सकडून खेळणाऱ्या १८ वर्षीय समितने आतापर्यंत चांगली खेळी केली आहे. त्याने मारलेले खणखणीत षटकार सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात आता समित डिसेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२५ ऑक्शनसाठी पात्र ठरणार का, ही चर्चा सुरू झाली आहे.

समित द्रविड IPL मध्ये खेळणार का?

आयपीएलच्या नियमानुसार खेळाडूने किमान दोन लिस्ट ए किंवा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे. त्या खेळाडूची संबंधित राज्य क्रिकेट संघटनेत नोंद झालेली असावी. BCCI ने आयोजित किंवा त्यांच्या मान्यतेने झालेल्या स्पर्धेत किमान दोन सामने खेळलेला असावा. प्रत्येक फ्रँचायझीची स्काऊट टीम अशा खेळाडूंवर लक्ष ठेवून असते आणि ते त्यांना ट्रायलसाठी बोलावतात.

Samit Dravid IPL2025
Mumbai Indians ला मोठा धक्का बसणार? अत्यंत खास खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या वाटेवर

समितच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास त्याने अजून कर्नाटकच्या सीनियर संघात पदार्पण केलेले नाही. २०२३-२४च्या कूच बिहार स्पर्धेतील विजेत्या कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाचा तो सदस्य होता. लँकशायर संघाविरुद्ध तीन दिवसीय सामन्यात कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन एकादश संघातही तो होता.

आगामी रणजी करंडक स्पर्धेत समितला संधी मिळण्याची संधी आहे. जर त्याची सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेसाठी कर्नाटकच्या संघात निवड झाली आणि त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली, तर त्याची आयपीएल ऑक्शन पूलसाठी निवड होऊ शकते.

Samit Dravid IPL2025
Rashid Khan: 6,6,6,6,6,6; राशिद खानची तुफान फटकेबाजी, ट्वेंटी-२०त झळकावले वेगवान अर्धशतक, Video

कधी आहे आयपीएल ऑक्शन?

आयपीएल २०२५ साठी येत्या डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. याआधी बीसीसीआय रिटेशन पॉलिसी जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझीला किमान ६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देणार आहेत. शिवाय २०२१ मध्ये रद्द केलेला निवृत्त खेळाडूसाठीची नियमही आणण्याच्या तयारीत आहेत. यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूला ५ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष झाले असल्यास त्याची अनकॅप्ड खेळाडू म्हणून निवड करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.