कोच Gautam Gambhirला पहिल्या वन-डे मालिकेत हरवणारा 'गुरू' श्रीलंकेने कायम ठेवला

IND vs SL: द्विदेशीय वन-डे मालिकेत २७ वर्षानंतर भारताला हरवणाऱ्या प्रशिक्षकाची श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
gautam gambhir
gautam gambhiresakal
Updated on

Sanath Jayasuriya appointed as Sri Lanka Head Coach: ऑगस्टमध्ये श्रीलंकेने वन-डे मालिकेत भारताला २-० ने पराभूत केले. भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच वन-डे मालिका होती आणि या मालिकेत श्रीलंकेने भारताला पराभवाची धूळ चारली. मागील काही महिन्यातील श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रभारी प्रशिक्षक सनथ जयसूर्याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीलंकेचा माजी कर्णधार व फलंदाज सनथ जयसूर्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या समाप्तीपर्यंत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. जुलै महीन्यापासून त्याने पुरुष क्रिकेट संघामध्ये प्रशिक्षणाचे काम सुरू केले होते, परंतु तो प्रभारी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. पण आता त्याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करून त्याच्यावर संघाची पूर्णवेळ जबाबदारी सोपवली आहे.

गेल्या काही महिन्यांत जयसूर्याच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंका संघाने चांगली कामगिरी केली. श्रीलंकेने ऑगस्टमध्ये २७ वर्षानंतर भारताविरुद्धची पहिली द्विदेशीय वन-डे मालिका जिंकली. त्यानंतर १० वर्षांत प्रथमच इंग्लंडला कसोटीत पराभूत केले आणि अलीकडेच घरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला २-० ने व्हाईटवॉश केले. श्रीलंका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जयसूर्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतीम सामन्यात पोहचण्याचा प्रयत्न करेल.

"श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यांमधील संघाची चांगली कामगिरी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. जेथे जयसूर्या 'प्रभारी प्रशिक्षक' म्हणून काम पाहत होता. पण त्याची आता मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात येत आहे." असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे.

gautam gambhir
Pakistan Blast: पाकिस्तानात सुरक्षेचे तीन तेरा! PAK vs ENG कसोटी मालिकेपूर्वी वाढलं टेन्शन

याआधी जयसूर्या श्रीलंका संघात मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यरत होता. पण, आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कलमाअंतर्गत त्याला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच जयसूर्यावर संघामधील मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे. १३ ऑक्टोबरपासून सुरू होणारी वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका मुख्य प्रशिक्षक म्हणून जयसूर्याची पहिली मालिका असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.