Sandeep Lamichhane USA Visa : नेपाळ क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. नेपाळ क्रिकेट संघाचा अव्वल फिरकीपटू संदीप लामिछाची नुकतेच बलात्काराच्या आरोपातून मुक्तता झाली होती. मात्र त्याचा अमेरिकेसाठीचा व्हिसा नाकारल्याने त्याला आता टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये भाग घेता येणार नाहीये. याची माहिती खुद्द संदीप लामिछानेने सोशल मीडियावरून दिली. लामिछानेचा 2019 मध्ये देखील व्हिसा नाकारण्यात आला होता.
नेपाळ क्रिकेट असोसिएशनने संदीप लामिछानेचा टी 20 वर्ल्डकप संघात समावेश केला नव्हता. जे खेळाडू जेलमध्ये गेलेले असतात त्यांना आयसीसीकडून क्लिअरन्स मिळाल्याशिवाय त्यांचा संघात समावेश करता येत नाही. कोर्टाने त्याची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केली होती.
तरी देखील त्याला आयसीसीच्या परवानगीची गरज होती. मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर नेपाळ क्रिकेट बोर्डाने त्याचा टी 20 वर्ल्डकप संघात समावेश केला. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर संदीप लामिछानेला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधून निलंबित केलं होतं. त्याच्या केसचा निकाल लागल्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळालं होतं.
रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, अनिल कुमार शाह, कुशल भुरतेल, कुशल मल्ला, दिपेंद्र सिंह ऐरी, ललित राजबनशी, करन केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अबिनेश बोहरा, सागर धाकल, कमल सिंह ऐरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.