India vs Bagladesh, 1st Test: भारत आणि बांगलादेश संघात पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) सुरू झाला आहे. चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूंनी दमदार खेळ केला. जडेजा आणि अश्विन यांच्या दीडशतकी भागीदारीमुळे भारताने ८० षटकात ६ बाद ३३९ धावा केल्या आहेत.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. बांगलादेशकडून हसन मेहमुदने सुरुवातीच्या ४ विकेट्स घेत भारताचा तणाव वाढवला होता. एकावेळी भारतीय संघ ६ बाद १४४ धावा अशी स्थितीत होता.
परंतु, नंतर आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी दमदार फलंदाजी करताना पहिल्या दिवस अखेरपर्यंत नाबाद १९५ धावांची भागीदारी केली. जडेजाने आधी संयमी खेळत करत अश्विनची साथ दिली. अश्विनचे अर्धशतक झाल्यानंतर त्यानेही त्याची गती वाढवत आक्रमक खेळ केला.
पहिल्या दिवस अखेर आर अश्विन ११२ चेंडूत १०२ धावांवर नाबाद आहे. तसेच रविंद्र जडेजा ११७ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८६ धावांवर नाबाद आहे.