Gautam Gambhir Press Conferences: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियामध्ये २२ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) खेळायची आहे. भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत ३-० असा पराभव पत्करला.
या पराभवामुळे आता भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका अंत्यत महत्त्वाची ठरणार आहे. कारण या मालिकेच्या निकालावर भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेतील भवितव्यही निश्चित होणार आहे.
दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघ रविवारी आणि सोमवारी दोन तुकड्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील सोमवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. त्यापूर्वी तो मुंबईमध्ये पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने विविध विषयांवर भाष्य केले.