अजून किती विश्रांती? रोहित, विराट, जसप्रीत यांच्या Duleep Trophy न खेळण्यावर माजी खेळाडूने आकडेवारीच मांडली

Sanjay Manjrekar Criticizes Resting of Star Players in Duleep Trophy: विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना दुलीप ट्रॉफीसाठी विश्रांती देण्याबाबत भारताच्याच माजी क्रिकेटपटूने आकडेवारी सादर करत प्रश्न उपस्थित केला आहे.
Virat Kohli, Rohit Sharma, Jasprit Bumrah
Virat Kohli, Rohit Sharma, Jasprit BumrahSakal
Updated on

Sanjay Manjrekar: भारतातील देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाला ५ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत अनेक युवा आणि अनुभवी खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यामध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, ऋषभ पंत असे अनेक खेळाडू दिसणार आहेत.

मात्र असं असलं तरी स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या चारही संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश नाही.

रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आलेला, परंतु सिराज आजारी आहे, त्यामुळे तो खेळणार नाही. तसेच जडेजाने या स्पर्धेतून माघार घेतली असून त्यामुळे तोही या स्पर्धेत खेळणार नाही.

एकूणच विराट, रोहित आणि बुमराहला सातत्याने दिल्या जाणाऱ्या विश्रांतीबाबत आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टिप्पणी केली आहे.

Virat Kohli, Rohit Sharma, Jasprit Bumrah
DULEEP TROPHY UPDATES: मोहम्मद सिराज आजारी पडला, रवींद्र जडेजाची माघार; नेमकं घडतंय काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.