Sanju Samson Duck Out: सलग दोन शतकं अन् मग दोन भोपळे, सॅमसनचं 'या' नकोशा विक्रमाच्या यादीत नाव

South Africa vs India 3rd T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन शुन्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसे विक्रम नोंदवले गेले आहेत.
Sanju Samson | South Africa vs India 3rd T20I
Sanju Samson | South Africa vs India 3rd T20ISakal
Updated on

Sanju Samson: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात भारताय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने दमदार शतक ठोकत शानदार केली होती. मात्र या शतकानंतर संजूला एकही धाव तिसऱ्या सामन्यानंतर त्याच्या खात्यात जोडता आलेला नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ चार सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सॅमसनने शतक ठोकले होते. त्यावेळी तो सलग दोन टी२० सामन्यात भारतासाठी शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला होता.

त्याने ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धही शतक केले होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील शतकानंतर तो नंतरच्या दोन्ही टी२० सामन्यात शुन्यावर बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रमही झाला.

Sanju Samson | South Africa vs India 3rd T20I
IND vs SA, T20I: तिलक वर्माची सेंच्युरियनमध्ये पहिली Century! रैनाचा १४ वर्षे जूना विक्रमही मोडला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.