India vs South Africa 1st T20I: डर्बनमधील किंग्समेड मैदानात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात आक्रमक खेळ पाहायला मिळाला. त्याने चौकार षटकारांची बरसात करताना शतकी खेळी केली. त्याचे हे शतक विक्रमीही ठरले.
दरम्यान, २०१५ साली पदार्पण केलेल्या संजू सॅमसनला आत्तापर्यंत भारतासाठी ३४ टी२० सामनेच खेळता आले आहेत. सॅमसन बऱ्याचदा भारतीय संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिले प्राधान्य देण्यात आलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तर ऋषभ पंतच भारताची पहिली पसंती राहिला आहे.
पण असे असतानाही सॅमसनने जिद्द हरलेली नाही. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सलग दुसरे शतक करत त्याची हिच खंत बोलूनही दाखवली आहे.