IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

Sarfaraz Khan, Dhruv Jurel and Yash Dayal released from India Test squad: बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटी सुरु असतानाच भारतीय संघातून सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना मुक्त करण्यात आले आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

Irani Cup 2024: भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यानच बीसीसीआयने सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना भारतीय संघातून मुक्त केले आहे.

हे तिघेही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होते. मात्र त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे या तिघांनाही १ ऑक्टोबरपासून लखनौला सुरू होणाऱ्या इराणी कप स्पर्धेसाठी या तिघांनाही मुक्त करण्यात आले आहे.

त्यामुळे आता इराणी कप स्पर्धेत सर्फराज मुंबईकडून खेळताना दिसू शकतो, तर ध्रुव जुरेल आणि यश दयाल शेष भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतात.

Team India
मयंक अगरवालच्या भारत अ संघाने जिंकली Duleep Trophy; रोमांचक सामन्यात सुदर्शनच्या शतकानंतरही ऋतुराजच्या संघाचा पराभव

खरंतर यापूर्वीच सर्फराजचा मुंबई संघात, तर ध्रुव जुरेल आणि यश दयालचा शेष भारत संघात समावेश करण्यात आलेला होता, पण त्यांची उपलब्धता भारतीय संघ त्यांना मुक्त करणार की नाही यावर अवलंबुन होती. आता त्यांना मुक्त केले असल्याने ते इराणी कप सामन्यात सामील होऊ शकतात.

इराणी कप स्पर्धेचा सामना १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धेचे विजेते मुंबई आणि शेष भारत या संघात होणार आहे.

Team India
ऋतुराज गायकवाड Vs Ajinkya Rahane! श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी हेही भिडणार; वाचा जबरदस्त सामना केव्हा कुठे रंगणार

इराणी कप स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणाही झाली आहे. मुंबईचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. रहाणेच्या नेतृत्वातच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४ जिंकली होती. तसेच इराणी कप २०२४ स्पर्धेसाठी शेष भारत संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे.

इराणी कप २०२४ साठी दोन्ही संघ -

  • मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस, सर्फराज खान.

  • शेष भारत संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.