IPL 2024 पूर्वी BCCI चा मोठा निर्णय! केंद्रीय करारात केला मोठे बदल, 'या' दोन खेळाडूंची झाली एन्ट्री

Sarfaraz Khan and Dhruv Jurel News : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणातच चमकदार कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी आनंदाची बातमी मिळाली आहे.
Sarfaraz Khan and Dhruv Jurel News Marathi
Sarfaraz Khan and Dhruv Jurel News Marathisakal
Updated on

Sarfaraz Khan and Dhruv Jurel News : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणातच चमकदार कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी आनंदाची बातमी मिळाली आहे. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना बीसीसीआयने मोठी भेट दिली आहे. या दोन्ही फलंदाजांचा केंद्रीय करार मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

सोमवारी बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली ज्यामध्ये सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना केंद्रीय करारामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांना बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या श्रेणी सी मध्ये स्थान मिळाले आहे आणि त्यांचे वार्षिक रिटेनरशिप फी 1 कोटी रुपये असेल.

Sarfaraz Khan and Dhruv Jurel News Marathi
KL Rahul : IPL च्या तोंडावर BCCIची केएल राहुलबाबत मोठी घोषणा! संपूर्ण हंगाम खेळायचा असेल तर...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) केंद्रीय करारामध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना स्थान न मिळाल्याने बराच गदारोळ झाला होता. रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे बीसीसीआयने या दोन अनुभवी खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळले होते.

मात्र, नंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळला. दरम्यान, बोर्डाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेत दोन युवा फलंदाजांचा केंद्रीय करारात समावेश केला आहे.

Sarfaraz Khan and Dhruv Jurel News Marathi
Live मॅचमध्ये घडली मोठी घटना! एकाच सामन्यात 4 खेळाडू जखमी, एकजण थेट पोहचला हॉस्पिटलमध्ये...

इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान सर्फराज आणि जुरेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबईकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या सर्फराजने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली होती. ज्युरेलने रांची कसोटीत 90 आणि 39 धावा केल्या होत्या. हा त्याचा दुसरा सामना होता आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.