Sarfaraz Khan चे ऐतिहासिक द्विशतक! सचिन, रहाणे, रोहितलाही जमलं नाही, ते त्यानं मुंबईसाठी करून दाखवलं

Sarfaraz Khan Double Century for Mumbai in Irani Cup: इराणी कप स्पर्धेत मुंबईकडून खेळताना सर्फराज खानने ऋतुराज गायकवाडच्या संघाविरुद्ध खेळताना द्विशतकी खेळी केली. त्याचे हे द्विशतक मुंबईसाठी ऐतिहासिक ठरले आहे.
Sarfaraz Khan Double Century
Sarfaraz Khan Double CenturySakal
Updated on

Mumbai vs Rest of India: इराणी कप २०२४ स्पर्धेच्या सामन्यात २०२३-२४ रणजी ट्रॉफी विजेता मुंबई संघ विरुद्ध शेष भारत संघ आमने-सामने आहेत.

मंगळवारपासून (१ ऑक्टोबर) हा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर सुरू असून या सामन्यात मुंबईने पहिल्या दोन्ही दिवसांवर वर्चस्व ठेवल्याचे दिसून येत आहे. या सामन्यात सर्फराज खानने द्विशतकी खेळीही केली आहे. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी त्याचे द्विशतक पूर्ण केले.

त्याने मुंबईसाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून २५३ चेंडूत त्याचे द्विशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो इराणी कप स्पर्धेत द्विशतक करणारा मुंबईचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी इराणी कप स्पर्धेत मुंबईकडून कोणत्याच खेळाडूला द्विशतक करता आले नव्हते. त्यामुळे त्याच्यासाठी आणि मुंबईसाठी हे ऐतिहासिक द्विशतक ठरले आहे.

Sarfaraz Khan Double Century
Irani Cup 2024: कॅप्टन Ajinkya Rahane शतकाच्या उंबरठ्यावर, तर श्रेयस अय्यर-सर्फराजच्याही फिफ्टी

शेष भारत संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. त्यांच्याकडून मुकेश कुमारने मुंबईच्या पहिल्या तीन विकेट्स घेत शानदार सुरुवातही केली होती. मुंबईने ३७ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या.

मात्र, नंतर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि सर्फराज खान यांच्या खडूस फलंदाजीने संघाला तारले. रहाणे आणि श्रेयस यांच्यात १०२ धावांची भागीदारी झाली. पण श्रेयस ८४ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. त्यानंतर सर्फराजने रहाणेला साथ दिली. पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंत हे दोघेही अर्धशतक करून नाबाद होते.

Sarfaraz Khan Double Century
स्मार्ट ऋतुराज! योग्य DRS अन् Ajinkya Rahane चे शतक ३ धावांनी हुकले; पण सर्फराजने झोडले

दुसऱ्या दिवशीही चांगली सुरुवात त्यांनी केली होती. पण रहाणेला यश दयालने बाद केले. रहाणेचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. त्याने २३४ चेंडूत ९७ धावा केल्या. त्यानंतरही मुंबईच्या तनुष कोटियनने सर्फराजला साथ दिली.

यादरम्यान सर्फराजने शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने धावांची गती वाढवली आणि द्विशतकही पूर्ण केले. त्याने आधी रहाणेबरोबर १३१ धावांची, तर नंतर तनुषबरोबर त्याने तब्बल १८३ धावांची भागीदारी केली. तनुष ६४ धावांवर बाद झाला. दरम्यान सर्फराजच्या या खेळीमुळे मुंबईने ५०० धावांचा टप्पा सहज ओलांडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.