मराठमोळा सौरभ नेत्रावळकरचं होणार पुनरागमन, या महत्त्वाच्या मालिकांसाठी USA संघाची घोषणा

Saurabh Netravalkar returns to international cricket: पालकत्वामुळे रजेवर असणारा सौरभ नेत्रावळकर नामिबिया दौऱ्यावर पुनरागमन करणार आहे.
saurabh netravalka
saurabh netravalkaesakal
Updated on

Saurabh Netravalkar: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील यूएसएचा स्टार मराठी खेळाडू सौरभ नेत्रावळकर ऑगस्टमधील यूएसएच्या नेदरलँड्स दौऱ्याला मुकला होता. पण आता तो पालकत्वाच्या रजेनंतर तो पुनरागमन करत आहे.

पहिल्याच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरी नंतर यूएसए संघ आता आगामी वन-डे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. यूएसए संघ १६ ते २६ सप्टेंबर दरम्यान नामिबिया दौऱ्यावर जाणार असून नामिबिया विरुद्ध ४ वन-डे सामने खेळेल. हे सामने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग २०२३-२७ चा भाग असतील. वन-डे सामन्यांनंतर यूएसए संघ नामिबिया विरुद्ध ४ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. यूएसएने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग २ साठी आपले वन-डे आणि ट्वेंटी-२० संघ जाहीर केले आहेत.

saurabh netravalka
जग्गजेतेपद गमावलं, तरी छप्परतोड कमाई; भारतीय अर्थव्यवस्थेने ODI World Cup 2023 नंतर कमवले '११ हजार कोटी'

सौरभ फक्त वन-डे खेळण्यासाठी सज्ज झाला असून त्याचा नामिबियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी निवडण्यात आले आहे. तसेच त्याला ट्वेंटी-२० मालिकेसाठी रजा मंजूर करण्यात आली आहे. सौरभच्या अनुपस्थितीमुळे २१ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अयान देसाईला पहिल्यांदाच ट्वेंटी-२० संघात स्थान दिले गेले आहे. देसाईने २३ वर्षाखालील सिएटल ऑर्कास संघाकडून टेक्सास सुपर किंग्ज विरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आणि डेव्हॉन कॉनवे व मार्कस स्टॉइनिस या मोठ्या खेळाडूंना ३० धावांवर बाद केले होते.

यूएसएचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील धमाकेदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली होती. त्याने भारत-यूएसए सामन्यात भारतीय स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहलीची विकेट घेतली होती. सौरभने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये एकूण ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत ३३ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये एकूण ३३ विकेट्स घेतल्या आहेत, तर ४८ वन-डे सामन्यांमध्ये एकूण ७३ विकेट्स घेतल्या आहेत.

सौरभ नेत्रावळकर हा यूएसएचा वेगवान गोलंदाज असून त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरूवात क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईमधून केली. मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफीमधून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सौरभने भारतीय १९ वर्षाखालील संघाचे देखील प्रतिनिधित्व केले होते. सौरभ सध्या अमेरिकेतील ओरॅकल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.

saurabh netravalka
Jay Shah यांच्या अध्यक्षतेखालील ACC बैठकीत महिला क्रिकेटबाबत मोठा निर्णय, वर्ल्ड कपपूर्वी होणार महत्त्वाची स्पर्धा

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग २ साठी यूएसए वन-डे संघ:

मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रिज गौस, हरमीत सिंग, जसदीप सिंग, ज्यूनॉय ड्रायसडेल, मिलिंद कुमार, नोस्थूशा केंजिगे, सैतेजा मुक्कामल्ला, स्मित पटेल, सुशांत मोदानी, सौरभ नेत्रावलकर, शायन जहांगीर, शेडली व्हॅन शाकविक, उत्कर्ष श्रीवास्तव, यसीर मोहम्मद .

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग २ साठी यूएसए ट्वेंटी-२० संघ:

मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रिज गौस, अभिषेक पराडकर, अयान देसाई, हरमीत सिंग, ज्यूनॉय ड्रायसडेल, मिलिंद कुमार, नितीश कुमार, नोस्थूशा केंजिगे, जसदीप सिंग, स्मित पटेल, सैतेजा मुक्कामल्ला, शायन जहांगीर, उत्कर्ष श्रीवास्तव, यासीर मोहम्मद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.