Josh Inglis Fastest Century by Australian : ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिसने आज स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली. पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ट्रॅव्हिस हेड व मिचेल मार्शने तुफान फटकेबाजी केली होती. पण, आज स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी हेडला भोपळ्यावर माघारी पाठवले. जॅक फ्रेझर मॅकगर्क ( १६) फार काही करू शकला नाही. पण, जोश इंग्लिसने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ऑस्ट्रेलियाकडून वेगवान शतक झळकावले.
इंग्लिस व कॅमेरून ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियाला २ बाद २३ वरून सावरले आणि ११५ धावांपर्यंत पोहोचवले. ग्रीन २९ चेंडूंत २ चौकार २ षटकारांसह ३६ धावांवर माघारी परतला. इंग्लिस मैदानावर उभा राहिला. त्याने ७ चौकार व ७ षटकारांसह अवघ्या १४ चेंडूंत ७० धावांची आतषबाजी केली. इंग्लिसने ४३ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाकडून हे वेगवान शतक ठरले.
इंग्लिसने एकूण ४९ चेंडूंत १०३ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने २० धावांची खेळी करून २० षटकांत संघाला ४ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. टीम डेव्हिडनेही १७ धावा केल्या.
५ - ग्लेन मॅक्सवेल
२ - आरोन फिंच
२- जोश इंग्लिस
१ - डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन
४३- जोश इंग्लिस विरुद्ध स्कॉटलंड, एडिनबर्ग, २०२४ ४७ - आरोन फिंच विरुद्ध इंग्लंड , साउथॅम्प्टन, २०१३
४७ - जोश इंग्लिस विरुद्ध भारत, विशाखापट्टणम, २०२३
४७ - ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध भारत, गुवाहाटी, २०२३
४९- ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.