George Munsey : T10 सामन्यात फलंदाजाचे वादळी शतक; १० चौकार अन् ६ षटकारांची आतषबाजी, मोडला भारतीयाचा विक्रम Video

Zim Afro T10 League : स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीने 60-60 चेंडूंच्या लढतीत वादळी शतक झळकावले.
George Munsey
George Munsey esakal
Updated on

Scotland’s George Munsey : स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीने रेकॉर्ड ब्रेकींग फटकेबाजी केली. त्याने झिम आफ्रो टी १० लीगमध्ये शतक झळकावणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. त्याने २६३ च्या स्ट्राईक रेटने ३८ चेंडूंत शतक झळकावले. या खेळलीत त्याने १० चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. T10 मध्ये वेगवान शतकाचा विक्रम इंग्लंडच्या विल जॅक्सच्या नावावर आहे. त्याने २०२३ मध्ये २५ चेंडूंत शतक झळकावले होते.

Zim Afro T10 Leagueच्या १६व्या सामन्यात मुन्सीने वादळी खेळी केली. या लीगमध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे आणि त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याचा विक्रम मोडला. या लीगमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम रॉबिनच्या ( ८८ धावा) नावावर होता. सामन्यात डर्बन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हरारे बोल्ट्सला दुसऱ्याच षटकात धक्का बसला, परंतु मुन्सीने आक्रमक खेळी करून संघाला १० षटकांत १७४ धावांपर्यंत पोहोचवले.

मुन्सीने जनिश्का परेरासोबत १३७ धावांची भागीदारी केली, जी या लीगमधील सर्वोत्तम ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना डर्बनने पहिल्या दोन षटकांत ३६ धावा कुटल्या. पण, त्यानंतर त्यांच्या विकेट्स पडल्या आणि त्यांना १० षटकांत ६ बाद ११० धावाच करता आल्या. हरारे संघाने ५४ धावांनी हा सामना जिंकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व करताना ३१ वर्षीय जॉर्जने ५९ वन डे सामन्यांत १ शतक व १३ अर्धशतकांसह १८९५ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२०त त्याने ७४ सामन्यांत २०७८ धावा कुटल्या आहेत. त्यात २ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

George Munsey
IND vs BAN 2nd Kanpur Test: टीम इंडियाने टॉस जिंकला, १९६४ नंतर धाडसी निर्णय घेणारा Rohit Sharma पहिलाच कर्णधार ठरला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.