Mumbai Indians ला मोठा धक्का बसणार? अत्यंत खास खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या वाटेवर

IPL 2025 Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वापूर्वी मुंबई इंडियन्सला आणखी काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
zaheer khan
zaheer khanesakal
Updated on

IPL 2025 LSG vs MI Zaheer Khan : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ पूर्वी अनेक संघांमध्ये काही ना काही बदल पाहायला मिळणार आहेत. त्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कर्णधार बदलापासून ते रोहित शर्मा, सूर्याकुमार यादव यांची साथ सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात आणखी एक प्रमुख व्यक्ती मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आहे. MI चा ग्लोबल हेड कोच झहीर खान लखनौ सुपर जायंट्स ( LSG) च्या मेंटॉर बनण्यासाठी इच्छुक आहे. त्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत.

या चर्चेला यश आल्यास तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) लखनौ फ्रँचायझीमधील दोन प्रमुख व्यक्तींची जागा घेऊ शकतो. २०२३ मध्ये गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्स संघात परत गेल्यानंतर LSG कडे मार्गदर्शक नाही. त्यात मॉर्ने मॉर्केलही टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षक झाला आहे. अशात झहीर खानकडे या दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, असे वृत्त क्रिक बजने दिले आहे.

zaheer khan
Mumbai Indians हार्दिक पांड्याचा गेम करणार? नवा कॅप्टन निवडणार

आयपीएलमधील सूत्रांच्या मते गंभीरच्या भूमिकेसाठी झहीरचा विचार केला जात आहे आणि तो त्याचा अनुभव लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यात वापरू शकतो. टीम इंडियामध्ये गंभीरच्या नवीन सेटअपमध्ये झहीरचा विचार संभाव्य गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून केला जात होता. पण, मॉर्केलची निवड केली गेली. लखनौ सुपर जायंट्स सेटअपमध्ये झहीर मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि ॲडम व्होजेस, लान्स क्लुजनर आणि जॉन्टी रोड्ससह काम करेल. संजीव गोएंका यांच्या मालकीच्या फ्रँचायझीमध्ये आणखी एक मोठं नाव प्रशिक्षक म्हणून जोडलं जाण्याची चर्चा आहे.

zaheer khan
Mumbai Indians फ्रँचायझीच्या संघाची रिटेन लिस्ट जाहीर, वाचा किती व कोणत्या खेळाडूंना राखले कायम

झहीरने भारतासाठी ९२ कसोटी, २०० वन डे आणि १७ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. १०० आयपीएल सामन्यांमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सकडू खेळला. त्याने २०१७ मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. बीसीसीआय या महिन्याच्या अखेरीस रिटेन नियम जाहीर करतील. बीसीसीआय संघांना RTM पर्यायासह सुमारे सहा रिटेंशनची परवानगी देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.