India Women Cricket team
India Women Cricket teamX/BCCIWomen

INDW vs SAW: भारतीय संघात 17 वर्षीय गोलंदाजाची एन्ट्री; तिन्ही फॉरमॅटमध्ये BCCI कडून मिळाली संधी

Shabnam Shakil: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिन्ही फॉरमॅटमधील मालिकांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात 17 वर्षीय गोलंदाजाला संधी दिली आहे.
Published on

India Women vs South Africa Women: दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांचा भारतीय महिला संघाविरुद्ध सध्या वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेनंतर या दोन्ही संघात एक कसोटी सामना आणि टी20 मालिका खेळवली जाणार आहे.

आता उर्वरित एक वनडे सामना, कसोटी सामना आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघात 17 वर्षीय शबनम शाकिल हिचा समावेश करण्यात आला आहे.

मध्यमगती गोलंदाज असणारी शबनमला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय कोणताही बदल भारतीय संघात करण्यात आलेला नाही.

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील अखेरचा सामना 23 जून रोजी बंगळुरूमध्ये खेळायचा आहे. त्यानंतर दोन्ही संघ चेन्नईला जाणार असून तिथे 28 जून ते 1 जुलै दरम्यान कसोटी सामना खेळवला जाईल. त्यानंतर चेन्नईमध्येच 5 ते 9 जुलैदरम्यान टी20 मालिकाही होणार आहे.

India Women Cricket team
युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

सध्या भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धूरा पुजा वस्त्राकर आणि रेणुका ठाकूर सांभाळत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने शबनमचा समावेश केलेला असण्याची शक्यता आहे.

शबनम सध्या बंगळुरूमध्येच होती. तिचा वेगावान गोलंदाजांच्या शिबीरात समावेश करण्यात आला होता. तसेच दक्षिण आफ्रिका महिला संघाने खेळलेल्या सराव सामन्यातही ती बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघाकडून खेळली.

शबमनने गुजरात जायंट्सकडून वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा खेळली असून तिने 4 सामन्यांत 4 विकेट्स घेतल्या.

India Women Cricket team
T20 World Cup: भारताच्या पहिल्याच सुपर-8 सामन्यात येणार पावसाचा अडथळा? पाहा काय आहेत हवामान अंदाज

भारतीय संघ -

  • वनडे मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, राधा यादव, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्राकार, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया, शबनम शाकिल

  • कसोटी सामन्यासाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया, शबनम शाकिल

  • टी२० मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, शबनम शाकिल

    राखीव खेळाडू - सायका इशाक

दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारत दौरा -

वनडे मालिका -

  • 16 जून - पहिला वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

  • 19 जून - दुसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

  • 23 जून - तिसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

कसोटी सामना -

  • 28 जून ते 1 जुलै - एकमेव कसोटी सामना, चेन्नई (वेळ - स. 9.30 वाजता)

टी20 मालिका

  • 5 जुलै - पहिला टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

  • 7 जुलै - दुसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

  • 9 जुलै - तिसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.