WPL 2024 MIW Shabnim Ismail Fastest Bowler : वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारी दक्षिण आफ्रिकेची माजी वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने इतिहास रचला. महिला क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम इस्माईलने केला. तिने 130 किलोमीटर प्रतितास वेगाचा मार्क ओलांडली आहे.
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची गोलंदाज शबनिम इस्माईलने 132.1 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला.
महिला क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बॉलरने 130 किलोमीटर प्रतितास वेगाचा मार्क ओलांडली होती. तिने ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगला सामन्याच्या तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकला. हा चेंडू लेनिंगच्या पॅडला लागला.
मागील आठही आयसीसी महिला टी-20 विश्वचषकांमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी खेळलेल्या आणि गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या स्पर्धेनंतर इस्माईलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यापूर्वी इस्माईलने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 128 kmph (79.54mph) वेगाने गोलंदाजी केली होती. 2022 मध्ये ICC महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सर्वात अलीकडील आवृत्तीत दोनदा 127kmph या वेगाने चेंडू टाकला होता.
महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून गौरवल्या गेलेल्या, दक्षिण आफ्रिकेच्या या बॉलरने 317 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिच्या एकूण टॅलीमध्ये 3 कसोटी विकेट, 191 एकदिवसीय विकेट्स आणि T20I मध्ये 123 विकेट्सचा समावेश आहे.
सामन्यानंतरच्या मुलाखतीदरम्यान विक्रम मोडण्याबद्दल प्रश्न विचारला असता, इस्माईलने प्रितिक्रिया दिली की 'मी जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा मी स्क्रीनकडे पाहत नाही.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.