IND vs BAN: कानपूरमध्येच खेळणार कारकिर्दीचा शेवटचा सामना? शाकिब अल हसनने स्पष्टच सांगितलं की...

Bangladesh cricketer: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Shakib al Hasan
Shakib al Hasanesakal
Updated on

Shakib Al Hasan Retirement: भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुखापत व सुमार फॉर्म यामुळे टीकेचा धनी ठरलेला बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन याने कानपूर कसोटीच्या पूर्वसंध्येला ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, तसेच मायदेशात अर्थातच बांगलादेशात कसोटी क्रिकेटचा अखेरचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे तेथे सामने खेळवता येतील की नाही याबाबात प्रश्‍नचिन्ह आहे. बांगलादेशात कसोटी सामना खेळवण्यात आला नाही, तर शाकीब अल हसनच्या कसोटी कारकिर्दीचा अखेरचा सामना कानपूर येथेच पार पडेल.

शाकीब अल हसन याप्रसंगी म्हणाला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मी अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळलो. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील माझ्या भविष्याबाबत निवड समिती सदस्यांसोबत चर्चा केली. २०२६ मधील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे आतापासूनच लक्ष द्यायला हवे. माझ्याऐवजी नव्या दमाचा खेळाडू संघात येऊ शकेल. यासाठी ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

शाकीब अल हसन याने १२९ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये त्याने २५५१ धावा व १४९ विकेट्स घेतले आहेत. तर शाकीबने ७१ आयपीएल सामने देखील खेळले आहे. ज्यामध्ये त्याने ७९३ धावा व ६३ विकेट्स घेतले आहेत.

Shakib al Hasan
IND vs BAN 2nd Test : बॅटिंग पिचवर Rohit Sharma ने गोलंदाजी का करायचं ठरवलं? त्या एका गोष्टीमुळे Kuldeep Yadav संघाबाहेर राहिला

विनंती मान्य

शाकीब अल हसन या वेळी म्हणाला, माझा अखेरचा कसोटी सामना मीरपूर येथे खेळवण्यात यावा, अशी विनंती बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे केली. त्यांनी ही विनंती मान्यही केली.

भारतविरूद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना

सध्या भारत-बांगलादेशदरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ज्यात पहिला सामना २८० धावांनी जिंकून भारताने विजयी सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या सामन्याला कानपूर येथे आजपासून सुरूवात झाली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार प्रथम फलंदाजीसाठी आलेला बांगलादेश संघ २ बाद ७२ धावसंख्येवर खेळत आहे. या दोन्ही विकेट्स भारतीय गोलंदाज आकाश दीप याने घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.