बांगलादेशात निवृत्तीची कसोटी खेळायला जाण्यास Shakib Al Hasan चा नकार; म्हणाला...

Shakib Al Hasan T20 retirement: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर ट्वेंटी-२० क्रिकोटमधून निवृत्ती जाहीर केली व शेवटतचा कसोटी सामना मायदेशात खेळण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु भारताविरूद्धचा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना ठरण्याची शक्यता आहे.
shakib al hasan
shakib al hasanesakal
Updated on

Shakib Al Hasan: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिब सध्या त्याच्या कुटुंबासह अमेरिकेत राहतो. बांगलादेशातील निदर्शनांदरम्यान झालेल्या खुनाच्या आरोपामुळे शकिब मायदेशी परतणार नसल्याचे त्याने सांगितले.

भारत बांगलादेश कसोटी सामन्यादरम्यान शकिबने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी शाकिबने मायदेशात अर्थातच बांगलादेशात अखेरचा कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर २१ ऑक्टोबरपासून बांगलादेशमध्ये सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी शाकिबला संघात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शाकिब त्याचा अखेरचा कसोटी सामना मायदेशात खेळेल, यावर शिक्कामोर्तब झाला होता. परंतु, हाती आलेल्या नव्या वृत्तानुसार शाकिब मायदेशी परतणार नसल्याची बातमी समोर येत आहे.

त्याच्यावर खुनाचा अरोप असल्यामुळे तो मायदेशी परतणार नसल्याचे त्याने सांगितले, शाकिब म्हणाला, "मी पुढे कुठे जाणार आहे याची मला खात्री नाही, परंतु मी बांगलादेशात जाणार नाही हे जवळपास निश्चित आहे."

shakib al hasan
Shakib Al Hasan ला बांगलादेशात जायची वाटतेय भीती; म्हणतो, हवीय सुरक्षेची हमी

काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये सरकारविरूद्ध देशव्यापी निदर्शने झाली व ऑगस्टमध्ये अवामी लीग पक्षला सत्तेतून काढून टाकण्यात आले. सरकार जाईपर्यंत शाकिब संसद सदस्य होता. सरकार पडल्यानंतर, अवामी लीगचे अनेक राजकारणी लपून बसले होते, त्यांना अटक करण्यात आली व देश सोडण्यास बंदी घालण्यात आली.

निदर्शना दरम्यान काही विद्यार्थ्यांची हत्या झाली आणि शाकिबवर त्यांच्या खूनाचा आरोप करून एफआयआर दाखल केला गेला. त्यामुळे त्याला पाकिस्तान दौऱ्यावर असताना कोर्टाकडून मायदेशात परतण्यासाठी नोटीस देण्यात आली. परंतु बीसीबीने त्याला दोषी सिद्ध होईपर्यंत राष्ट्रीय संघातून खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे शाकिब पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत दौऱ्यावर आला. पण, कसोटी मालिकेनंतर त्याने ट्वेंटी-२० क्रिकोटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारताविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका तो खेळू शकला नाही.

shakib al hasan
Shakib Al Hasan अखेरचा सामना मायदेशातच खेळणार! ढाका कसोटीसाठी बांगलादेश संघात समावेश

बांगलादेशचे सध्याचे क्रीडा सल्लागार आसिफ महमूद यांनीही खेळाडूंनाला राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. एका वृत्तानुसार त्यांनी कोणतीही अयोग्य परिस्थिती टाळण्यासाठी शाकिबला मायदेशात न परतण्याचा सल्ला दिला होता.

"कोणतीही अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी मी शाकीबला बांगलादेशात न येण्याचा सल्ला दिला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,"आसिफ महमूद म्हणाले.

बांगलादेश संघ २१ ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध घरच्या मैदानात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरूद्ध त्यांची कसोटी मालिका होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.