Shakib Al Hasan
Shakib Al HasanSakal

Shakib Al Hasan अखेरचा सामना मायदेशातच खेळणार! ढाका कसोटीसाठी बांगलादेश संघात समावेश

Shakib Al Hasan Last Test Match: शाकिब अल हसनला मायदेशात अखेरचा कसोटी सामना खेळायला मिळणार की नाही, यावर गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह होते. परंतु आता त्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
Published on

Bangladesh vs South Africa: दक्षिण आफ्रिका संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आलेला आहे. या दौऱ्यात त्यांना दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून पहिला सामना ढाकामध्ये खेळला जाणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी बुधवारी बांगलादेशच्या संघाची घोषणा करण्यात आली असून दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शाकिब त्याचा अखेरचा कसोटी सामना मायदेशात खेळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शाकिबने गेल्या महिन्यात भारताविरुद्ध कानपूर कसोटीत खेळण्यादरम्यान सांगितले होते की ढाकामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला अखेरचा सामना खेळण्याची इच्छा आहे. मात्र, त्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान त्याने घेतलेल्या भूमिकेमुळे तो वादात अडकला होता. त्यामुळे घरच्या मैदानावर देशासाठी अखेरचा सामना त्याने खेळण्यावर साशंकता होती.

Shakib Al Hasan
Shakib Al Hasan IND vs BAN: शाकिब अल हसनवर हत्येचा गुन्हा; भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी BCB चा मोठा निर्णय
Loading content, please wait...