Shardul Thakur: रोहित शर्माला मी मस्का लावू शकतो...! शार्दूल ठाकूरच्या मनात नेमकं चाललंय काय?

Shardul Thakur on Rohit Sharma and MS Dhoni: शार्दुल ठाकूरने रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यातील एकाची निवड करताना एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
Shardul Thakur | MS Dhoni | Rohit Sharma
Shardul Thakur | MS Dhoni | Rohit SharmaSakal
Updated on

Shardul Thakur News: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर सध्या दुखापतीतून सावरत आहे. जून २०२४ मध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान, शार्दुल त्याच्या कारकि‍र्दीत एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

आता त्याने या दोघांबद्दल आपली मतं व्यक्त केली असून रोहितबद्दल एक मजेशीर कमेंटही केली आहे.

Shardul Thakur | MS Dhoni | Rohit Sharma
Cricket Funny Moments: 'जा बॉलच देत नाय...', भारतीय फलंदाजाने Six हाणला, अन् चिडलेला तो चेंडू न देण्यावर ठाम राहिला

शार्दुलने आयआयएशएमच्या एका कार्यक्रमात त्याला धोनी आणि रोहित यांच्यातील एकाची निवड करण्यास सांगितले. यावेळी त्याने धोनीचं नाव घेतले. तसेच त्यानं असंही म्हटलं की रोहित त्याचा चांगला मित्र आहे, त्यामुळे तो समजून घेईल.

शार्दुल म्हणाला, 'रोहित हा माझा मित्र आधी आहे, त्यामुळे मी धोनीचं नाव घेईल. रोहित समजून घेईल, जरी तो चिडला, तरी मी त्याला मस्का मारेल आणि म्हणेल, रोहित नो प्रॉब्लेम. जेव्हा हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत जाईल, तेव्हा तो फोनवर माझ्याशी टिपिकल रोहित शर्मासारखंच बोलेल.'

दरम्यान, शार्दुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच सामने रोहितच्या नेतृत्वातही खेळला आहे. तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना शार्दुल धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.

Shardul Thakur | MS Dhoni | Rohit Sharma
Shardul Thakur Surgery: शार्दुल ठाकूरवर झाली सर्जरी, पुन्हा क्रिकेटच्या मैदानात कधी करणार पुनरागमन?

रोहित आणि धोनी हे दोघेही भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जातात. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३३२ सामन्यांत नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी२० वर्ल्ड कर, २०११ वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धा जिंकल्या आहेत.

तसेच रोहितनेही १२६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात भारताने नुकताच टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली. तसेच २०२३ मध्ये कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.