Shikhar Dhawan Retirement: सक्सेसफूल होना और धन कमाना हैं ! शिखर धवनने सांगितला निवृत्तीनंतरचा मोठा प्लान

Shikhar Dhawan Retired : गब्बर अर्थात शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत धवनने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
Shikhar Dhawan
Shikhar Dhawanesakal
Updated on

Shikhar Dhawan Gabbar Retirement : भारताचा सलामीवीर शिखर धवन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धवन निवृत्तीनंतर काय करणार हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय... मागील दोन वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि या काळात तो सोशल मीडियावर Reels बनवून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसला. मागील काही वर्षांत धवनच्या वैयक्तिक आयुष्यातही बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. पत्नी आयेशा मुखर्जीसोबत झालेल्या घटस्फोटानंतर धवनला मुलगा जोरावर याच्यापासून दूर व्हावे लागले. त्याच्या आठवणीत धवन अनेकदा हळवा झालेला दिसला. आता तो निवृत्तीनंतर काय करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे...

धवन निवृत्ती घेऊन काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहे. क्रिकेटपटू निवृत्तीनंतर समालोचनाचा मार्ग निवडतात, पण धवनने या पर्यायासह अनेक गोष्टी प्लान केलेल्या आहेत. धवनने शनिवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. ३८ वर्षीय अनुभवी फलंदाजाने प्रत्येक टप्प्यात त्याला साथ दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले.

भविष्याबद्दल धवन काय म्हणाला?

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना धवनने निवृत्तीनंतरच्या प्लानबद्दल सांगितले. त्याने अनेक उपक्रम सुरू केले आहेत... द वन ग्रुप, त्याची फाऊंडेशन, त्याचा टॉक शो 'धवन करेंगे', डबल एक्सएल चित्रपटातील कॅमिओ, त्याने स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी फंडात खूप गुंतवणूक केली आहे आणि आता दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एक संघ विकत घेतला आहे.

निवृत्तीनंतर तो कोणाला जास्तीत जास्त वेळ देऊ इच्छितो, यावर धवन म्हणाला,''केवळ माझ्यासाठीच नाही, तर माझ्या उपक्रमात संबंधित सर्व लोकांसाठी मला यशस्वी व्हायचे आहे आणि पैसे कमवायचे आहेत. व्यवसाय असो, मनोरंजन असो किंवा राजकारण असो, मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. मला फक्त प्रवाहासोबत जायचे आहे. माझ्यासाठी आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी यश मिळवणे हे माझे ध्येय आहे.''

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan Retirement: शिखर धवन मुलगा जोरावरच्या आठवणीने भावूक; म्हणाला, त्याला हे माहित...

निवृत्तीनंतरच्या भविष्याबद्दल बोलताना धवन म्हणाला,''मी माझ्या उपक्रमांद्वारे आधीच चांगला नफा कमावत आहे. क्रिकेटमधील अनुभवामुळे माझ्याकडे समालोचन वगैरे करण्याचा पर्याय आहेच. पण, मी काहीतरी नवीन आणि मोठे करण्याच्या तयारीत आहे. मला उंच झेप घ्यायची आहे आणि त्यात अपयशी होण्याची भीती वाटत नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.