मानलं बेटा! Shivam Dube ने ग्राऊंड स्टाफला दिली प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराची सर्व रक्कम

Shivam Dube POTM award - झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या यंग ब्रिगेडने ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ४-१ अशी जिंकली.
Shivam Dube award money to ground staff
Shivam Dube award money to ground staff sakal
Updated on

Shivam Dube award money to ground staff : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सीनियर्स खेळाडू विश्रांतीवर गेले. त्यामुळेच झिम्बाब्वे दौऱ्यावर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ४-१ ने जिंकली. या मालिकेतील शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यातील सामनावीर शिवम दुबे ( Shivam Dube) याने मन जिंकणारी कृती केली. भारताच्या अष्टपैलू खेळाडूने मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारासोबत मिळालेली बक्षीस रक्कम हरारेच्या ग्राऊंड स्टाफला दिली.

त्यांच्या मेहनतीची ओळख आणि कदर करणे गरजेचे आहे, असे मत शिवमने व्यक्त केले. हरारे येथे झालेल्या पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात शिवमने १२ चेंडूंत २६ धावा करताना संघाला ६ बाद १६७ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर २५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या आणि भारताला ४२ धावांनी विजय मिळवून दिला.

Shivam Dube award money to ground staff
Captain Suryakumar Yadav : कर्णधारपद मिळेल, पण...! सूर्यकुमार यादवला BCCI ने दिला इशारा; हार्दिकचा चेहरा खुलला

"झिम्बाब्वे मधील ग्राउंड स्टाफने उल्लेखनीय काम केले आहे. आम्हाला खेळण्यासाठी उत्कृष्ट मैदान त्यांनी तयार केले. त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण अनेकदा दुर्लक्षित केले जाते, म्हणून त्यांच्या प्रयत्नांबद्दल मला कौतुक करायचे होते आणि कृतज्ञता व्यक्त करायची होती," असे शिवमने आयएएनएसला सांगितले.

"माझ्या सामनावीर पुरस्काराची रक्कम देऊन, त्यांच्या योगदानाच कौतुक करण्याचा आणि त्यांना थोड्या प्रमाणात पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सामना यशस्वी करण्यात त्यांचेही योगदान होते आणि ते ओळखणे आवश्यक आहे. मी त्यांच्या मेहनतीची कदर करा,” असेही तो पुढे म्हणाला.

Shivam Dube award money to ground staff
''गौतम गंभीर प्रशिक्षक होत असेल तर...''; कपिल देव यांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

शिवम दुबेची कारकीर्द..

शिवम दुबेने ३२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ३१.०७ च्या सरासरीने ४३५ धावा केल्या आणि ११ विकेट्सही घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना शिवमने आपल्या स्फोटक फटकेबाजीने निवड समितीला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्वतःला घेण्यास भाग पाडले. पण, ८ सामन्यांत त्याला केवळ १३३ धावा करता आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com