Pakistan vs Bangladesh: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम दुखापतीमुळे सामन्याबाहेर

Shoriful Islam replaced by Taskin Ahmedin : शरीफुल इस्लाम दुखापतीमुळे सामन्याबाहेर गेल्याने तस्किन अहमदला संघात सामील करण्यात आले आहे.
Shoriful Islam
Shoriful Islamesakal
Updated on

Shoriful Islam injury: रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. पण हा सामना सुरू असतानाच बांगलादेशला मोठा धक्का बसला.

या सामन्यातून वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लाम हा कंबरेच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने १० विकेट राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यामध्ये शोरीफुलने तीन बळी घेतले होते. २ षटकारांसह १४ चेंडूंमध्ये २२ धावा करत फलंदाजी मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली होती.

परंतु पहिल्या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे शोरीफुलला दुसऱ्या कसोटी सामन्यांमधून बाहेर बसावे लागणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी त्याच्या जागी संघामध्ये तस्किन अहमदचा समावेश करण्यात आला आहे.

Shoriful Islam
0,4,4,0,4,6! पाकिस्तानी गोलंदाजाची बेक्कार धुलाई, Dwaine Pretorius ने मिळवून दिला थरारक विजय

बांगलादेश संघाचे फिजिओ बायजेदुल इस्लाम खान यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या कसोटीनंतर शोरीफुलने मांडीच्या भागात अस्वस्थतेची तक्रार केली असता त्यासंदर्भात चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये शरीफुलच्या दुखापतीची पुष्टी झाली होती.

फिजिओ म्हणाले "पहिल्या चाचणीनंतर शोरीफुलचा एमआरआय करण्यात आला होता त्यामध्ये मांडीच्या सांध्यात दुखापत असल्याचे लक्षात आले होते. ही दुखापत फारशी गंभीर नाही. परंतु, तरी अशा दुखापतीमधून बरे होण्यास साधारणत: १० दिवस लागतात आणि त्याने या दुखापतीमधून सावरण्यास सुरुवात केली आहे आहे."

तीन वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शोरीफुलने ११ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने २५ विकेटसह ८४३ धावा केल्या आहेत.

Shoriful Islam
Rahul Dravid Son: समित द्रविडची टीम इंडियात निवड वशिलेबाजीने नव्हे, तर कर्तुत्वाच्या जोरावर...; पाहा त्याची खणखणीत आकडेवारी

बांगलादेशचा पुढील दौरा भारताचा असणार आहे. या भारत दौऱ्यात पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे खेळला जाणार आहे. तर या दौऱ्यामध्ये एकूण २ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामने खेळवले जातील. भारताविरुद्धचे हे दोन कसोटी सामने खेळण्यासाठी शोरीफुल लवकरत लवकर तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत आहे.

बांगलादेशच्या २०२४च्या अखेरीपर्यंच्या वेळापत्रकात भारत दौऱ्यानंतर, ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात दोन कसोटी सामने आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजचा पूर्ण दौरा आयोजित केला गेला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.