Shreyas Iyer ने केली सुनील नरीनच्या गोलंदाजीची कॉपी! Gautam Gambhir ला करतोय इम्प्रेस? Video

Shreyas Iyer copied bowling style: बुची बाबू टूर्नामेंटमधून श्रेयस अय्यर आगामी दुलीप ट्रॉफीची तयारी करतोय...
Shreyas Iyer
Shreyas Iyeresakal
Updated on

Shreyas Iyer buchi babu tournament : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर बुची बाबू स्पर्धेतून आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. पण, तो चक्क गोलंदाजी करताना दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने KKR मधील सहकारी सुनील नरीनच्या गोलंदाजीची कॉपी केलेली पाहायला मिळाली.

दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ड संघाचा कर्णधार आहे. तत्पूर्वी, तो बुची बाबू स्पर्धेत खेळतोय. या स्पर्धेत अय्यरने गोलंदाजी कौशल्य दाखवले. मुंबईचा हा स्टार खेळाडू आयपीएल संघातील सहकारी सुनील नरीनच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसला. आता तो ही गोलंदाजी, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला इम्प्रेस करण्यासाठी करतोय, अशी चर्चा रंगली आहे.

Shreyas Iyer
हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर U19 World Cup विजेत्या भारतीय कर्णधाराचं क्रिकेटमध्ये पुनरागमन!

गौतम गंभीरचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ?

बुची बाबू टूर्नामेंटमध्ये मुंबई विरुद्ध TNCA XI सामन्यात पहिल्या दिवसातील शेवटचे षटक अय्यरने टाकले. त्याने पहिल्या पाच चेंडूत फक्त एक धाव दिली, पण शेवटच्या चेंडूवर आर. सोनू यादवने षटकार ठोकला. त्यामुळे तामीळनाडू संघाने दिवसअखेर ५ बाद २८५ धावा उभ्या केल्या.

श्रेयस अय्यर आपली अष्टपैलू क्षमता भारतीय निवड समितीसमोर दाखवण्यासाठी सज्ज आहे. अय्यर दुलीप ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारत ड संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या संघात अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, इशान किशन, हर्षित राणा या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

भारत ड संघ: श्रेयस अय्यर ( कर्णधार ), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन ( यष्टिरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता , केएस भरत ( यष्टिरक्षक), सौरभ कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.