IND vs SL, ODI: श्रेयस अय्यरचा डायरेक्ट हिट अन् श्रीलंकेच्या मेंडिसबरोबर झाला 'गुलीगत धोका', पाहा Video

Shreyas Iyer Direct Hit: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरने अफलातून डायरेक्ट हिटवर कामिंदू मेंडिस रनआऊट झाला होता.
Shreyas Iyer | India vs Sri Lanka
Shreyas Iyer | India vs Sri LankaSakal
Updated on

Shreyas Iyer Direct Throw to run out Kamindu Mendis : श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (४ ऑगस्ट) झाला. कोलंबोला झालेल्या सामन्यात श्रीलंकेने ३२ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. असं असलं तरी या सामन्यात श्रेयस अय्यरने केलेल्या एका धावबादची मोठी चर्चा झाली.

भारतीय संघात काही खेळाडू चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात. त्यात श्रेयस अय्यरचंही नाव घेतलं जातं. याचाच अनुभव या सामन्यादरम्यानही आला.

झाले असे की श्रीलंका संघाकडून कामिंडू मेंडिस आणि अकिला धनंजया फलंदाजी करत होते. यावेळी अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मेंडिसने अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर शॉट खेळला आणि धनंजयासह त्याने पहिली धाव पूर्ण केली.

त्यानंतर ते दुसऱ्या धावेसाठीही पळाले. पण त्याचवेळी श्रेयस अय्यरने डीप मिड-विकेटवरून थेट स्टंपवर नेम धरला आणि चेंडू फेकला. तो चेंडूही वेगात येत मेंडिस क्रिजमध्ये येण्यापूर्वीच स्टंपवर आदळला. त्यामुळे मेंडिसला ४० धावांवर धावबाद होऊन परत जावं लागलं. दरम्यान, अय्यरचा हा थ्रो पाहून मेंडिसही चकीत झाला होता.

Shreyas Iyer | India vs Sri Lanka
IND vs SL 2nd ODI: वेल्लालागे पुन्हा नडला अन् श्रीलंकेच्या शेपटानं घाम फोडला! भारतासमोर विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य

दरम्यान, त्याच्या पुढच्याच चेंडूवरही विराटने अकिला धनंजयालाही धावबाद केले. त्यामुळे श्रीलंकाने ५० षटकात २४० धावा केल्या.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताचा पहिल्याच चेंडूवर पाथम निसंकाची विकेट गमावली होती. परंतु, अविष्का फर्नांडो (४०) आणि कुशल मेंडिस (३०) यांनी डाव सावरताना ७४ धावांची भागीदारी केली.

पण या दोघांना वॉशिंग्टन सुंदरने बाद केल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी कोलमडली होती. तरी दुनिथ वेल्लालागे आणि कामिंदू मेंडिस यांनी अर्धशतकी भागीदारी करताना श्रीलंकेला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. वेल्लालागे ३९ धावांवर बाद झाल्यानंतरही धनंजयाने मेंडिसला साथ दिली होती. मेंडिसने ४० धावा केल्या, तर धनंजयाने १५ धावा केल्या.

Shreyas Iyer | India vs Sri Lanka
IND vs SL: अन् रोहित शर्मा live सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला मारायला पळाला, पाहा Video

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ४२.२ षटकात सर्वबाद २०८ धावाच करता आल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलने ४४ धावांची खेळी केली. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

श्रीलंकेकडून जेफ्री वाँडरसेने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या, तर चरिथ असलंकाने ३ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.