Shreyas Iyer : खोटं बोलला श्रेयस अय्यर? फिटनेसवर NCA केला मोठा खुलासा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने पुढच्या दोन सामन्यांमध्ये दमदार पुनरागमन करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली....
Shreyas Iyer Marathi
Shreyas Iyer Marathi sakal
Updated on

Shreyas Iyer Update : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने पुढच्या दोन सामन्यांमध्ये दमदार पुनरागमन करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सगळ्यामध्ये टीम इंडियाचे काही खेळाडू मैदानाबाहेरील त्यांच्या वागण्यामुळे आणि बीसीसीआयच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे चर्चेत आहेत.

इशान किशनचे प्रकरण सर्वांसमोर असून आता त्यात एक नवीन नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे श्रेयस अय्यर. टीम इंडियाच्या या फलंदाजाबद्दल असा अहवाल समोर आला आहे, ज्यामुळे तो खोटं बोलतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Shreyas Iyer Marathi
Ranji Trophy : BMW अन् 1 कोटी... 'ही' ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणार बक्षीस! अध्यक्षांची मोठी घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा भाग असलेला श्रेयस अय्यरला शेवटच्या 3 सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याने पाठदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर या कारणामुळे त्याला संघात स्थान मिळाले नसल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचे कारण देखील त्याचा फॉर्म पण होता. आणि निवड समितीने त्याला रणजी ट्रॉफी खेळायला सांगितले होते.

Shreyas Iyer Marathi
IPL 2024 Schedule : 22 मार्चला चेन्नईत फुटणार आयपीएलचा नारळ, कधी होणार अंतिम सामना?

रणजी ट्रॉफीमध्ये श्रेयस मुंबईकडून खेळताना दिसेल अशी अपेक्षा होती, पण आधी तो ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यातून आणि आता क्वार्टर फायनल सामन्यात खेळण्यास नकार दिला. पाठदुखीचे कारण देत श्रेयसने मुंबईच्या निवड समितीला उपांत्यपूर्व फेरीत खेळता न आल्याची माहिती दिली होती.

याप्रकरणी आता एक नवा खुलासा समोर आला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने निवड समितीला सांगितले की अय्यरला कोणतीही नवीन दुखापत झालेली नाही आणि तो तंदुरुस्त आहे.

Shreyas Iyer Marathi
Shubman Gill : वर्तमानकाळात जगणे महत्त्वाचे ; शुभमन गिल रांची सामन्याच्या दोन दिवस अगोदर पत्रकारांशी बोलताना

एनसीएमधील क्रीडा विज्ञान विभागाचे प्रमुख आणि टीम इंडियाचे माजी मुख्य फिजिओ नितीन पटेल यांनी बोर्डाला ईमेलद्वारे ही माहिती दिली. श्रेयस अय्यरने पाठदुखीमुळे रणजी न खेळण्याचा निर्णय घेतल्याच्या एका दिवसानंतर त्याचा हा ईमेल आला आहे.

या ईमेलमध्ये पटेल यांनी लिहिले आहे की, दुसऱ्या कसोटीनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेस अहवालात श्रेयस अय्यर तंदुरुस्त होता. आणि तो निवडीसाठी उपलब्ध होतो. इतकंच नाही तर टीम इंडियातून वगळल्यानंतरही श्रेयसला कोणतीही नवीन दुखापत झालेली नाही, असंही ईमेलमध्ये म्हटलं आहे. आता या अहवालानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, रणजी सामना खेळू नये म्हणून श्रेयसने मुंबई संघ व्यवस्थापनाला दुखापतीचे खोटे कारण सांगितले का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.