Shreyas Iyer : काल कर्णधार रोहित बोलला अन् आज श्रेयस अय्यरने घेतला मोठा निर्णय!
Ranji Trophy 2024 : रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला आणि यासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या विजयात टीमच्या युवा खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ध्रुव जुरेलने पहिल्या डावात 90 धावांची खेळी केली ज्याने संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. यशाची भूक असलेल्या खेळाडूंनाच संघात स्थान मिळेल, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना जिंकल्यानंतर जाहीर व्यक्तव्य करुन प्रामुख्याने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना इशारा दिला होता. ती मात्राही लागू पडली आणि लगेचच श्रेयसने आपली उपलबद्धता मुंबई क्रिकेट संघटनेला कळवली.
दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असलेला श्रेयस अय्यर तंदुरुस्त झाला असून तो रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळणार आहे. 2 मार्चला रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईचा सामना तामिळनाडूशी होणार आहे. हा सामना मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर श्रेयस अय्यर नरमला अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
काही दिवसाआधी दुखापतीचे कारण देत तो रणजीच्या उपांत्यपूर्व सामन्यातून बाहेर पडला होता. पण त्यानंतर एनसीएने स्पष्ट केले की, टीम इंडिया सोडल्यानंतर फलंदाजाला कोणतीही नवीन दुखापत झाली नाही.
अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत 35, 13, 27 आणि 29 धावा केल्या, त्यानंतर त्याला उर्वरित मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. अय्यर गेल्या 12 महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि संपूर्ण आयपीएल 2023 आणि डब्ल्यूटीसी फायनलला तो मुकला होता.
रणजी ट्रॉफीच्या दोन्ही सेमीफायनल 2 मार्चपासून खेळल्या जाणार आहेत. एका सामन्यात नागपूरमध्ये मध्य प्रदेशचा सामना विदर्भाशी तर दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईचा सामना तामिळनाडूशी होणार असून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना 10 मार्चपासून खेळला जाणार आहे.
संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, भुपेन लालवानी, अमोघ भटकळ, मुशीर खान, प्रसाद पवार, हार्दिक तामारे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉस्टन डायस, धवल कुलकर्णी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.