Shubman Gill : हार्दिक, सूर्या अन् संजूला डावलून शुभमनच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ; बीसीसीआयने दिले मोठे संकेत

Shubman Gill ZIM vs IND : संघात ऋतुराज अन् संजू असतानाही बीसीसीआयने शुबमन गिलला कर्णधार का केलं?
Shubman Gill
Shubman Gill ZIM vs IND ESAKAL
Updated on

Shubman Gill Team India Captain : बीसीसीआयने नुकतेच झिम्बाब्वेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली. भारतीय संघ सध्या टी 20 वर्ल्डकप खेळत असल्याने आणि मालिका वर्ल्डकपनंतर लगेच होत असल्याने बीसीसीआयने मुख्य संघातील जवळपास सर्वांनाच विश्रांती दिली आहे.

त्यामुळे या संघात भारताचा संपूर्ण युवा संघ खेळणार असून या युवा संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. गिलचे टी 20 वर्ल्डकपचे तिकीट थोडक्यात हुकले होते. डावखुऱ्या यशस्वी जयस्वालची संघात वर्णी लागली. गिल हा स्टँड बाय खेळाडू म्हणून वेस्ट इंडीजमध्ये गेला होता. मात्र बीसीसीआयने त्याला मायदेशी पाठवलं.

Shubman Gill
Ravichandran Ashwin : अफगाणिस्तानच्या विजयानं पाकच्या पोटात दुखलं... पत्रकारानं भारताला मधी ओढलं, अश्विननं थेट मस्कलाच केलं टॅग

हार्दिक अन् सूर्याला का केलं नाही कर्णधार?

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय हे झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्या किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला कर्णधार करणार होते. मात्र या दोघांनी बीसीसीआयकडे विश्रांतीची मागणी केली होती. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेसाठी भारतीय संघात निवडल्या गेलेल्या खेळाडूंना त्यांच्या आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर संघात स्थान दिले गेले आहे. या संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे.

भारताचा झिम्बाब्वे दौरा

  • पहिला T20- 6 जुलै, हरारे (PM 4.30)

  • दुसरा T20- 07 जुलै, हरारे (PM 4.30)

  • तिसरा T20- 10 जुलै, हरारे (PM 4.30)

  • चौथा T20- 13 जुलै, हरारे (PM 4.30)

  • पाचवा T20- 14 जुलै, हरारे (PM 4.30)

Shubman Gill
T20 World Cup: नवा ट्विस्ट! ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान जाणार बाहेर, तर बांगलादेश मारणार सेमीफायनलमध्ये एन्ट्री? जाणून घ्या गणित

शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात भारताचे नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन देखील आहे. मात्र त्यांना डावलून शुबमन गिलला कर्णधार करण्यात आलं आहे. यातून बीसीसीआयने एक मोठा संकेत दिला आहे.

बीसीसीआयच्या भविष्यातील संभाव्य भारतीय संघाच्या कर्णधारांमध्ये शुभमन गिलचा देखील समावेश असेल. गिलने यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केलं होते. त्याच्याकडे आता भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे.

भारतीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्वोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.